Pune News : शिवनेरी बसच्या चालकाने वाजवले हॉर्न, राग आल्यानं तिघांनी चालकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवनेरी बसच्या चालकाने हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने तिघांनी चालकाला शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना घडली आहे. यात चालक गंभीर जखमी झाला आहे. दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

बादल महेंद्र ढावरे (वय २६, रा. मंगळवार पेठ) व मेहबूब दस्तगीर सिंदगी (वय २६,रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बसचालक अमोल गायकवाड (वय ३४, रा. देहू) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल गायकवाड राज्य परिवहन विभागात चालक आहेत. दोन दिवसांपुर्वी रात्री अकराच्या सुमारास ते शिवनेरी बस घेउन चालले होते. मालधक्का चौकात अमोलने बसचा हॉर्न वाजविला. त्याचा राग आल्यामुळे तिघांनी शिवनेरी बस अडवून चालकाला हॉर्न का वाचविला अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर दुखापत केली. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन पवार करीत आहेत.