Pune News | निर्बंध डावलून दुपारी 4 नंतरही लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने सुरू? दुकानदार- पोलिसांत शाब्दिक बाचाबाची

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News | मागील दीड वर्षांपासून कोरोनाने (Corona virus) अनेक लोकांना विशेष म्हणजे व्यावसायिकांना तारलं आहे. यंदाच्या दुसऱ्या लाटेत अनेक व्यापाराचे दुकाने बंद होती. यामुळे आपला धंदा कसा चालणार? हाच मुळात प्रश्न समोर उभा होता. तर, पुण्यात (Pune) सर्व व्यावसायिक दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, कोरोनाच्या लाटेने आर्थिक नुकसान सोसलेल्या व्यापाऱ्यांनी पुण्यातील लक्ष्मी रोडवर (laxmi road) रस्त्यावरील सरकारचे नियम उधळून लावून बुधवारी दुपारी 4 नंतरही दुकाने सुरु ठेवली.

दरम्यान, कोरोनामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत, बुधवारी व्यापाऱ्यांनी दुकाने
चार नंतरही दुकाने चालू ठेवल्याने, यावरून पोलीस-व्यापारी यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली आहे.
नाईलाजास्तव पोलिसांना (Police) कारवाई करावी लागली.
अनेक दुकानदारांवर गुन्हे देखील दाखल झालेत.
तसेच, अतिक्रमण कारवाईमुळे महात्मा ज्योतिबा फुले शेतीमाल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि विक्रेते राजाभाऊ कासुर्डे यांनी सायंकाळी 4 च्या सुमारास पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे व्यापारी, विक्रेत्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
अचानक करण्यात आलेल्या अतिक्रमण विभागाच्या (Department of Encroachment) या कारवाईमुळे मंडई ठिकाणातील विक्रेत्यांनी टिळक चौकात जमून विरोध करण्याचा त्यावेळी
प्रयत्न केला. याप्रकरानंतर तेथील स्थानिक पोलिसांनी अध्यक्ष कासुर्डे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना
अधिक चौकशीसाठी पोलीस (Police) चौकीत नेण्यात आले.

 

Web Title : Pune News | Shops on laxmi Road open after 4 pm despite restrictions ?; Shopkeeper- Verbal confrontation with the police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँकेत 920 जागांसाठी बंपर भरती

Ratnagiri Flood | पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले ? अनिल परब यांनी केला खुलासा, म्हणाले…

Library Wall | पोलंडहून आली अद्भूत छायाचित्रे, विद्यापीठाच्या भिंतीवर लिहिलेत उपनिषदातील श्लोक; भारतीय दूतावासाने केले ‘ट्विट’