Pune News | केंद्र सरकारच्या पाळत प्रकरणी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मूक आंदोलन

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News | इस्त्राईल देशातील एका खाजगी कंपनीचे सॉफ्टवेअर वापरून देशातील अनेक नेत्यांवर, न्यायाधीशांवर, अधिकाऱ्यांवर तसेच पत्रकारांवरही केंद्र सरकारने पळत ठेवण्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीचा विरोध करण्यासाठी ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने आज (21 जुलै 2021) दुपारी 2 वाजता गांधी भवन, पुणे (Pune News) येथे मूक आंदोलन करण्यात आले.

न्यायपालिका, संसद, प्रशासन व प्रसारमाध्यमे हे आपल्या लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत.
विदेशातील एका खाजगी कंपनीचे Pegasus नावाचे सॉफ्टवेअर वापरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, देशाचे निवडणूक आयुक्त, विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सरकारमधील मंत्री तसेच अनेक पत्रकारांवर पळत ठेवून केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकशाहीच्या चारही स्तंभांना सुरुंग लावला आहे. अनेक देशबांधवांच्या बलिदानाने उभी राहिलेली ही लोकशाही उध्वस्त करण्यासाठी
भारतीय जनता पक्षाकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य व गोपनीयता या देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करून
केंद्रातील हुकूमशाही सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र
संविधानाचा अवमान केला असून ही बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे.

Pune News | Silent agitation of all the three parties in the Mahavikas Aghadi on the issue of surveillance by the Central Government

केंद्र सरकारच्या या हुकूमशाही कारभाराला रोखण्यासाठी आता देशातील सर्व नागरिकांनी
एकजूट होण्याची आवश्यकता आहे.
लोकशाहीच्या रक्षणासाठी व संविधानाच्या सन्मानासाठी ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने आज “गांधी भवन, कोथरूड” येथे आंदोलन करण्यात आले.
भारतीय संविधानावर श्रद्धा असणाऱ्या व लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या सर्व देशबांधवांनी
या आंदोलनात सहभागी होत केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध नोंदवला.

Pune News | Silent agitation of all the three parties in the Mahavikas Aghadi on the issue of surveillance by the Central Government

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP city president Prashant Jagtap) , काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे (Congress city president and Former Minister Ramesh Bagwe) , शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे (Shiv Sena city president Sanjay More),गजानन थरकूडे , दिपाली धुमाळ राजलक्ष्मी भोसले , शाम देशपांडे , विकास दांगट ,
रविन्द्र माळवदकर , विजय डाकले , संतोष ढोक , ज्योती सुर्यवंशी , आनंद तांबे , प्रमोद शिंदे
इत्यादी प्रमुख उपस्थीत होते.

प्रास्ताविक प्रदीप देशमुख (NCP Youth Leader Pradeep Deshmukh) यांनी केले
तर आभार प्रदर्शन माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केले

Web Title : Pune News | Silent agitation of all the three parties in the Mahavikas Aghadi on the issue of surveillance by the Central Government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Transgender Reservation | सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांसाठी 1 टक्के जागा राखीव, ‘या’ सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

Pune Crime | पुण्यातील 43 वर्षीय महिलेची फेसबुकवरून झाली त्याच्याशी ओळख, पुढं घडलं भलतच

Raj Kundra porn Film Case | ‘मला 30 लाख देत होता, मी त्याचे 20 प्रोजेक्ट केले; ‘या’ अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप