Pune News | पुण्यात सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरामध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, अन्…. (Video)

दीड तास हा गोंधळ सुरु होता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | आंबेगाव (Ambegaon) मधील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरामध्ये (Sinhgad College Campus Area) एक थरारक प्रकार नागरिकांना अनुभवायला मिळाला. याठिकाणी 21 वर्षीय तरुणांने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला (Attempt To Suicide). पोलिस आणि अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांमुळे आणि सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला. तरुणाला पोलिस आणि अग्निशमन दलातील जवानांनी जीवाची बाजी लावून वाचवल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. (Pune News)

गुरुवारी (दि.05) सिंहगड कॉलेज कॅम्पस येथील अंबर ग्रीन सोसायटीच्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी सुमारे 8 वाजता विवेक पारखी (वय 21) या तरुणाने चौथ्या मजल्यावरील टेरेस वरुन आत्महत्येचा प्रयत्न करत होता. आसपासच्या लोकांना ही बाब लक्षात येताच लोकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना खबर दिली. परिस्थिती लक्षात घेत पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. या ठिकाणी जाऊन जवानांनी संरक्षण जाळे पसरवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत घटनास्थळी लोकांनी देखील मोठी गर्दी केली. गोंधळ चालू होता. सुमारे दीड तास हा गोंधळ सुरु होता. (Pune News)

Pune News

आत्महत्या करणाऱ्या विवेक पारखी या तरुणाला वाचवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत होते आणि
संरक्षण जाळे पसरवत होते. ते पसरवत असतानाच तरुणाने चौथ्या मजल्यावरुन स्वतः झोकून दिले आणि खाली उडी मारली.
प्रसंगावधान दाखवत बचाव करणाऱ्या पथकाने तरुणाला वरच्या वर झेलले आणि त्याचा जीव वाचवला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharti Vidyapeeth Police Station) अंकित आंबेगाव पठार पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, बिट मार्शल आणि अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी अक्षरशः स्वतः चा जीव धोक्यात घालून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा जीव वाचवला. यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही घटना आणि दृश्य पाहणाऱ्या लोकांना देखील हे बचावकार्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. आत्महत्या करणाऱ्या विवेकचे प्राण सुदैवाने वाचले आहेत. पोलीस तपासामध्ये विवेकने याआधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पुढील तपास करत आहेत. (Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Assistant Police Inspector Suicide | सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या