Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक कंट्रोल रूममध्ये ‘तैनात’, पोलीस अधीक्षकांचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जिल्हातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये( Shikrapur Gram Panchayat Election) स्थानिक पोलिस निरीक्षक उमेश तावसकर हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत निवडणूकीतील एका पॕनेलने निवडणूक आयोगासह संबंधित सर्व विभागाकडे तक्रार केली होती.

याच अनुशंगाने शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील निवडणूका शांततेत , निपक्षपणे व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरती शिक्रापुरचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांना निवडणूक काळातील १२ /०१/२०२१ ते १८/०१/२१ या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष येथे कर्तव्याकरिता तैनात करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत. तर या कालावधीत शिक्रापुर पोलिस ठाण्याचा प्रभारी पदभार सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट यांच्या कडे देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.