Pune News : कुख्यात गुंड गजा मारणे अ‍ॅन्ड गँगविरूध्द कठोर कारवाई करा;अहवाल पोलिस महासंचालकांना पाठवा – DG ऑफीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील कूविख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणेला ‘रॉयल इंट्री’ चांगलीच महागात पडली असून या रॉयल Entry ची पोलीस महासंचालक कार्यालयानं दखल घेत पुणे पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर या कारवाईचा एक अहवाल देखील पाठवण्याचे म्हटले आहे, अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुण्यातील गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांची गाजलेल्या खून खटल्यात न्यायालयाने सबळ पुरावा नसल्याने निर्दोष मुक्तता केली. यानंतर गजा मारणेची गेल्याच सोमवारी तळोजा कारागृहातून सुटका झाली. पण या सुटकेनंतर गजा मारणे याच्या साथीदार व समर्थकांनी त्याची तळोजा ते पुणे अशी शेकडो वाहने अन तरुणाईसोबत जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पुणे पोलिसांना जाग आली आणि त्यानंतर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याच्यासह 9 जणांना अटक केली. पण न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला. पण, तोपर्यंत गजा मारणे व इतरांवर पुणे, पिंपरी चिंचवड व खालापूर पोलीस ठाण्यात असे एकूण 5 गुन्हे दाखल केले आहेत.

यासर्व प्रकरणाची खुद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेत पुण्यात पोलिसांच्या कारेक्रमातच यावर भाष्य करत गुंडाच्या मिरवणुका शहरासाठी चांगली बाब नसल्याचे सांगत पुणे पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. आता याप्रकरणाची दखल पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी देखील घेतली आहे. पुणे पोलिसांना याप्रकरणात कठोर कारवाई करा. तसेच या कारवाईचा आतापर्यंतचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. आता पुणे पोलिसांकडून अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान, गजा मारणे आणि त्याची पलटण वारजेत गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले आहेत. वेगवेगळी पथके शोध घेत आहेत. पण, अद्याप तरी ते सापडलेले नाहीत.