Pune News : टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसने सादर केले ‘स्मार्टफ्लो’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसने (टीटीबीएस) स्मार्टफ्लो हा भविष्यासाठी सज्ज असा आधुनिक क्लाऊड कम्युनिकेशन सादर केला आहे, स्मार्टफ्लो कंपनी अंतर्गत कर्मचाऱ्यांदरम्यान आणि कंपनीच्या बाहेर ग्राहक आणि व्हेंडर्ससोबत सर्व प्लॅटफॉर्म्स आणि टच पॉईंट्सवर सर्व हितधारकांदरम्यान कोणताही व्यत्यय येऊ न देता कनेक्टिव्हिटी स्थापित करतो.

स्मार्टफ्लो व्यवसायांना कोणत्याही वेळी, कुठूनही, कोणतीही बाधा न येता, निरंतर संवाद आणि संबंधांमार्फत ग्राहकांसोबतचे आपले नाते अधिक घनिष्ठ करण्यासाठी सक्षम बनवतो.अशाप्रकारे व्यावसायिक विचार आणि कल्पना केवळ क्युबिकल्स पुरत्या मर्यादीत न राहता कर्मचारी आपल्या निवडीनुसार कुठूनही अधिक चांगले काम करू शकतात.

हे अगदी पटकन सेटअप केले जाऊ शकते आणि यासाठी काहीही इंस्टॉलेशन चार्जेस भरावे लागत नाहीत, तसेच कॅपेक्स गुंतवणूक करण्याची देखील गरज नाही. स्मार्टफ्लोसोबत ९९.५% ची अपटाइम गॅरंटी दिली जाते, टीटीबीएसच्या २४x७ व्यवस्थापित सेवा क्षमता आणि विश्वास या गॅरंटीचा आधार आहेत, यामुळे व्यवसायांसाठी कोणताही अडथळा न येता व्यवसायांची निरंतरता सुनिश्चित केली जाते.

Advt.

टाटा टेलि सर्व्हिसेस चे उपाध्यक्ष मन्नू सिंग यांनी स्मार्टफ्लोच्या लॉन्चबद्दल म्हणाले की उत्पादनांमध्ये नावीन्यपूर्णता असावी हे आमचे उद्धिष्ट स्मार्टफ्लोमधून दर्शवले जाते, स्मार्टफ्लो व्यवसायांना प्रभावी कामगिरी बजावण्यासाठी सक्षम बनवतो. व्यापक आणि प्रगत वैशिष्ट्यांसह स्मार्टफ्लो व्यवसायांच्या नव्या आणि वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी संपूर्णपणे सज्ज आहे. ग्राहकांसोबत संबंध, संवाद कायम ठेवण्यासाठी क्लाऊडवर आधारित प्लॅटफॉर्म्स ज्यांना हवे आहेत अशा व्यवसायांची संख्या वाढत आहे. या अतिशय मोठ्या आणि नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी टीटीबीएस सक्षम आहे.

स्मार्टफ्लो सर्व प्रकारच्या उद्योगक्षेत्रातील व्यवसायांसाठी अनुकूल आहे. कोणतेही स्टार्टअप असो किंवा ज्यांना बहुउपयुक्तता, मल्टिमोडल, किफायतशीर परंतु तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत क्लाऊड कम्युनिकेशन सुटची गरज छोटे व मोठे व्यवसाय असते. स्मार्टफ्लो सुविधांमध्ये अनेक ग्राहकांना रस आहे असे टीटीबीएसच्या लक्षात आले असून यामध्ये बीएफएसआय, आयटी/ आयटीईएस, उत्पादन, शिक्षण, फिनटेक, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स यासारख्या विविध क्षेत्रांमधील उद्योगांचा समावेश आहे.

गार्टनरनुसार (Gartner) २०२१ मध्ये क्लाऊड टेलिफोनी मार्केट १८ टक्के वाढण्याचे अनुमान आहे कारण टेलिफोन गुंतवणूक प्राथमिकता क्लाउडवर स्थानांतरीत होत आहेत. टीटीबीएसने आपल्या सखोल ग्राहक ज्ञानाचा लाभ घेत हल्लीच्या काळात अनेक असे उपक्रम चालवले आहेत ज्यामुळे उद्योगांना नव्या आणि विश्वसनीय सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या स्पर्धात्मकतेला भारी प्रोत्साहन मिळेल. टीटीबीएसने क्लाऊडवर आधारीत सुविधा, सहयोग सुविधा, आयओटी, माहिती व्यवस्थापन आणि सायबरस्पेस सोल्युशन्स यासारख्या उद्यम ग्रेड सुविधांच्या आपल्या पोर्टफोलिओला अधिक मजबूत बनवले आहे. या सुविधा विविध ठिकाणी पसरलेल्या आणि रिमोट वर्किंग स्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या गरजा योग्य प्रकारे पूर्ण करतात आणि ग्राहकांना दक्षता व उत्पादकता यामध्ये काहीही तडजोड करावी न लागता व्यवसाय सामान्य मोडवर चालू ठेवण्यात सक्षम बनवतात.