Pune News : कात्रज चौक ते नवले ब्रिज दरम्यान टेम्पो पालटला, 8 जण जखमी झाल्याची माहिती

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कात्रज चौक ते नवले ब्रिजदरम्यान होणारी अपघाताची मालिका सुरू असून, आज (रविवार) पुन्हा नवले ब्रिजजवळ लग्न सोहळ्याचा एक भरधाव टेम्पोच पलटी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत असून, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवले ब्रिजकडून कात्रजकडे हा टेम्पो काही माणसं घेऊन येत होता. टेम्पो डी-मार्टच्या समोर आल्यानंतर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या कडेला आला. यावेळी टेम्पोच पलटी झाला. हा टेम्पो हळदीच्या कार्यक्रमाला जात असल्याचे कळते. अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..