Pune News | ‘डीएनडी’ असूनही अनावश्‍यक फोन ! जिओ आणि व्होडाफोन-आयडिया कंपन्यांविरोधात जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune News | मार्केटींगबाबत येणारे फोन टाळण्यासाठी ‘डू नॉट डिस्टर्ब’ (डीएनडी) ची सेवा सुरू केल्यानंतरही रोज तीन ते चार अनावश्‍यक फोन येत असल्याने वैतागलेल्या ग्राहकाने थेट रिलालायन्स जिओ (Jio)आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) कंपनीविरोधात ग्राहक आयोगात (Pune News) तक्रार दिली आहे.

सततच्या फोनमुळे होत असलेल्या त्रासामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या ग्राहकाने केली आहे. कॅम्प येथील रहिवासी मनमीत सिंग बवारी यांनी ॲड. स्वप्नील भालेराव यांच्यामार्फत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे दोन्ही कंपन्यांचे सिमकार्ड धारक आहेत.
२०१७ पासून त्यांनी आपल्या दोन्ही फोन क्रमांकावर डीएनडीची सेवा पूर्ण लाभासह नोंदणीकृत करून घेतली आहे.
परंतु नोव्हेंबर २०१८ पासून त्यांना विविध कंपन्यांचे मार्केटिंग करणारे फोन येऊ लागले.
यातील काही कॉल्स रोबोटिक आणि कृत्रिमपणे रेकॉर्ड केलेले असत.
तक्रारदार यांनी प्रत्येक कॉलवर पुन्हा फोन न करण्याची विनंती करून, टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया telecom regulatory authority of india (ट्राय) च्या नियमांनुसार १९०९ ला आलेल्या प्रत्येक कॉलची तक्रार त्या त्या टीएसपीच्या पोर्टलला नोंदवली.
परंतु त्यांच्या कुठल्याही तक्रारीची दखल न घेता यूसीसी टेलिकॉलरच्या विरोधात टीएसपी ने योग्य ती कारवाई केली नाही.
तक्रारी करूनही तक्रारदारांना यांना यूसीसी फोन येत आहेत, बवारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदार प्रत्येक ग्राहक जो डीएनडीची सेवा उपभोगत आहे, त्याला यूसीसी, स्पॅम, रोबोटिक,
टेलिमार्केटिंग यांच्या विरोधात ट्रायच्या नियमानुसार टीएसपी यांच्याकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे.
आम्ही दोन्ही कंपन्यांची मुख्यतः सेवेतील कमतरता व त्यातून होणा-या मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला आहे, असे ॲड. भालेराव यांनी सांगितले.

 

दोन्ही कंपन्यांनी मांडली बाजू :

याबाबत दोन्ही कंपन्यांनी आयोगात हजर होऊन आपले लेखी म्हणणे मांडले आहे. कंपन्यांची बाजू ऐकल्यानंतर त्यांच्या विरोधात दावा दाखल करून घेण्याचा आदेश आयोगाने दिला.
नागरिकांनी सायबर गुन्हे, फसव्या योजना व टेलिमार्केटिंग यांना बळी पडू नये.
पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची तक्रार दाखल करून घेण्यात आले आहे.
अशी माहिती अ‍ॅड. भालेराव यांनी दिली.

 

Web Title : Pune News | Unnecessary phone despite ‘DND’! File a complaint with the District Consumer Commission against Geo and Vodafone-Idea

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Stock | 42 वरून 800 रूपयांवर पोहचला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदार झाले मालामाल ! 1 लाखाचे झाले 19 लाख रुपये, तुमच्याकडे आहे का?

Maharashtra Lockdown | …तर संपुर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागतील; मंत्री विजय वडेट्टीवार

CM Uddhav Thackeray | मंदिरे उघडण्याबाबत CM उद्धव ठाकरे याचं मोठं विधान