Pune News : आम्ही लाँड्री व्यावसायिक पण सामान्य नागरिक आहोत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  देशभरात सर्वच व्यावसायिकांनी किंमती वाढवल्या आहेत. आम्ही कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती समजून त्यांनी सांगितलेल्या किंमतीलाच वस्तू घेत आहोत. पण आम्हीही सर्वसामान्य नागरिकच आहोत. मग आम्ही लाँड्रीचे दर का वाढवू नयेत, गेल्या 4-5 वर्षांपासून आम्ही दर वाढवलेले नाहीत त्यामुळे आता दर वाढवत आहोत. वाडीव वीज बील आले ते पुरवठा बंद होऊ नये म्हणून भरले परंतु आता त्यासंदर्भात शासनाकडून काही न समजल्यास आंदोलन करू असा इशारा लाँड्री व्यावसायिक संघाचे महासचिव अमित जाधव यांनी दिला.

ते म्हणाले, दिवसेंदिवस होत असलेली महागाई आणि आमच्या व्यवसायात होत असलेली घट याची सांगड घालणे अवघड झाले आहे. यासंदर्भात शासनाकडून परवानगी मिळाल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात व्यावसायिकांचे समुपदेशन/मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रकाश अभ्यंकर, खजिनदार राहुल राक्षे, उपाध्यक्ष गणेश चव्हाण आणि अरुण भालेकर उपस्थित होते.