Pune : भरधाव कारच्या धडकेत दीड वर्षाच्या मुलीसह महिलेचा मृत्यू; 3 वर्षाची मुलगी वाचली, कोंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका भिक्षेकरी महिलेचा आणि तिच्या दीड वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने 3 वर्षाची मुलगी या अपघातात बचावली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक विशाल कांबळे यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर फरार झाला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे वय अंदाजे ३५ वर तसेच बालिकेचे वय दीड वर्ष आहे. महिलेला एक मुलगा आणि मुलगी आहे. दरम्यान दोन दिवसाव परिसरातील कमानीजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास भरधाव मोटारीने पादचारी भिक्षेकरी महिला आणि तिच्याबरोबर असलेल्या दीड वर्षांच्या बालिकेला धडक दिली. महिलेबरोबर तीन वर्षांची मुलगी होती. अपघातात ती बचावली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भिक्षेकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर एकानेण गंभीर जखमी झालेल्या दीड वर्षांच्या बालिकेला घेऊन भारती रूग्णालयात घेऊन गेला. तेथे तिचा मृत्यू झाला. त्या तीन वर्षांच्या मुलीला पोलिसांनी ससून रूग्णालयात आवारातील सोफोश संस्थेत दाखल केले आहे. अद्यााप महिलेची ओळख पटलेले नाही. याबाबत काही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलोसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे।