Pune Parvati Crime | पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीसोबत विवाह, लग्नानंतर छळ करुन केला गर्भपात; पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Parvati Crime | सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेऊन विवाह केला. मुलीसोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून तिला गरोदर केले. यानंतर घरासाठी मुलीचा छळ करुन तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सन 2019 पासून 30 जानेवारी 2024 या कालावधीत खडकवासला (khadakwasla) येथील मुलीच्या सासरी घडला आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Parvati Crime )

याबाबत 20 वर्षाच्या पीडितेने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) शनिवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. यावरुन पती विश्वास राजेंद्र ताकतोडे (वय-25), सासरे राजेंद्र माणिकराव ताकतोडे (वय-60) दीर ओंकार राजेंद्र ताकतोडे (वय-22), सासू महानंदा ताकतोडे (वय-50), नणंद विद्या कांबळे (वय-25 सर्व रा. सिंहगड रोड) यांच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 366, 363, 341, 354, 354(क), 312, 323, 506, 504, 34 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वास ताकतोडे याने फिर्यादी अल्पवयीन असताना तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून आरोपीने 2019 मध्ये मुलीला येरवडा येथील घरातून पळवून नेले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न केले. या लग्नाला आरोपी विश्वास याचे कुटुंबिय उपस्थित होते.

लग्नानंतर आरोपीने मुलीसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
तसेच फिर्य़ादीकडे तिच्या आईचे राहते घर नावावर करुन द्यावे यासाठी आरोपींनी मुलीला मारहाण
करुन डांबून ठेवले. दरम्यान पीडित मुलगी गरोदर राहिली.
फिर्य़ादी यांच्या आईने राहते घर नावावर करुन देण्यासाठी सासरा व दिर यांनी मुलीला मारहाण केली.
यामुळे मुलीचा गर्भपात झाला. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला. तर इतर आरोपींनी शिवीगाळ, मारहाण करुन जाळून मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.टी. कांबळे (PSI ST Kamble) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”