Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी तोंडावर लाल तिखट टाकून एका तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी करुन खुनाचा प्रयत्न केला (Attempt To Kill). हा प्रकार आपटे रोडवर 4 फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला. या गुन्ह्याचा तपास करुन गन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. फिर्यादी यांच्या दाजीने मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. (Pune Crime Branch)

याप्रकरणी तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महेश महादेव ठोंबरे (वय-28 रा. जुना बस स्टॉप, संगमवाडी, सध्या रा. आगरवाल तालीम, कसबा पेठ, पुणे) व फिर्यादी यांचे दाजी अश्विनीकुमार शेषराव पाटील (वय-52 रा. कमलनिवास, संतोष बेकरीजवळ, आपटे रोड, शिवाजीनगर) यांना अटक केली आहे.

दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना युनिट एकचे पोलीस अंलदार दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, निलेश साबळे यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळापासून बालगंधर्व चौक, वृधेश्वर घाट, पुणे मनपा, गाडीतळ चौक, मालधक्का चौक या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज तपासून पोलिसांनी संशयित आरोपीची माहिती घेऊन माग कढून संशयित आरोपी हे पुणे स्टेशन येथे गेल्याचे निष्पन्न झाले.

सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करुन निष्पन्न झालेला आरोपी महेश ठोंबरे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सखोल तपास केला असता फिर्यादी यांचे दाजी यांच्या सांगण्यावरुन मध्यप्रदेशातील पैलवान फैजल खान व त्याच्या दोन मित्र यांना 50 हजार रुपयांची सुपारी देवुन हा गुन्ह्या केल्याचे सांगितले. यावरुन फिर्यादी यांचे दाजी अश्विनीकुमार पाटील याला ताब्यत घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद,
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे,
महेश बामगुडे, शुभम देसाई, निलेश साबळे, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, आय्याज दड्डीकर,
अभिनव लडकत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”