Pune Pimpri Chinchwad Accident | पिंपरी : भरधाव टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, आरोपीला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Accident | काम संपवून घरी जाणाऱ्या महिलेला भरधाव वेगातील आयशर टेम्पोने (डीडी 03 आर 9486) जोरात धडक दिली. यामध्ये टेम्पोचे चाक पोटावरुन गेल्याने महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.23) सकाळी पावणे बाराच्या सुमारास आकुर्डी येथील थरमॅक्स चौकातील (Thermax Chowk Akurdi) गरवारे कंपनीच्या गेटसमोर झाला. (Pune Pimpri Chinchwad Accident)

याबाबत मयत महिलेचा पती सुरेश मारुती भोसले (वय-59 रा. अजंठानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून आयशर टेम्पो चालक बिरेंद्रकुमार श्रीनिवास यादव (रा. बलिया गाव, पो. बक्सोती ता. गोविंदपुर जि. नवादा, बिहार) याच्यावर आयपीसी 304(अ), 279, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची पत्नी आकुर्डी येथे काम करुन घरी परत जात होत्या. त्यावेळी आरोपी त्याच्या ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो भरधाव वेगात घेऊन जात होता.

आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो हयगयीने व निष्काळजीपणे चालवून,
वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करुन फिर्यादी यांच्या पत्नीला गरवारे कंपनीसमोर जोरात धडक दिली.
फिर्यादी यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्या असता टेम्पोचे पुढील चाक त्यांच्या पोटावरुन गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar On Muralidhar Mohol | ‘मोहोळ यांनी पहिलवानांना कधी अर्धा लिटर दूध दिले नाही; बिल्डरांना मात्र पाजले’ – रवींद्र धंगेकर (Videos)

Lok Sabha Election 2024 | भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? पाच खासदारांचे तिकीट कापणार? संजय शिरसाट म्हणाले…

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यावर चाकूने हल्ला, येरवडा परिसरातील घटना

Pune Cheating Fraud Case | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

Manoj Jarange Patil-Maratha Community | मनोज जरांगेंची मराठा समाज बैठकीत मोठी घोषणा! राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात…

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…