Pune Cheating Fraud Case | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | मुलाला पुणे महापालिकेतील पर्वती जल केंद्र (Parvati Jal Kendra) येथे सुपरवायझर तर मुलीला प्रशासकीय वभागात ऑपरेटर अँन्ड नेटवर्किंग विभागात कायमस्वरूपी नोकरी लावण्याच्या बहाण्याने (Lure Of Job) एका व्यक्तीची 12 लाखांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी 2019 ते 25 फेब्रुवारी 2019 या कालावधीत येरवडा परिसरातील करुणा हौसिंग सोसायटीत (Karuna Housing Society Yerawada) घडली. (Pune Crime News)

याबाबत विजय चांद बेद (वय-55 रा. करुणा हौसिंग सोसायटी, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अविनाश बापु कांबळे Avinash Bapu Kamble (रा. वाल्मीकी हौसींग सोसायटी, कामगार वसाहत जवळ, येरवडा) याच्यावर आयपीसी 419, 420, 465, 468 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cheating Fraud Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश कांबळे याने फिर्यादी यांना मनुष्यबळाच्या भरती विभागात कार्यरत असल्याचे सांगितले. तुमच्या मुलाला व मुलीला पुणे महापालिकेत कायमस्वरुपी नोकरी लावतो असे सांगून फिर्यादी यांच्याकडून बारा लाख रुपये घेतले.

आरोपीने फिर्यादी यांचा मुलगा विजय याला पुणे महापालिकेच्या पर्वती जल केंद्र येथे सुपरवायझर आण मुलीला प्रशासकीय विभागात ऑपरेड अँड नेटवर्कींग या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. फिय़ादी यांच्याकडून पैसे घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन आरोपीने आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी. अहिरे (API V.D. Ahire) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Community | मनोज जरांगेंची मराठा समाज बैठकीत मोठी घोषणा! राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात…

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”