Coronavirus : चिकन खाण्यामुळं ‘कोरोना’ होत असल्याचं सिध्द केलं तर मिळणार 5 कोटीचं ‘बक्षीस’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहेत. एकूण 19 रुग्णांना कोरोनाचे संक्रमण झालं आहे. कोरोनामुळे लोक चिकन आणि अंडी खाणं टाळत आहेत. बाजारात चिकन 20 रुपये प्रति किलो इतके स्वस्त झाले आहे. यादरम्यान पुण्यातील चिकन विक्री करणाऱ्या एका बड्या व्यवसायिकाने लोकांची भीती दूर करण्यासाठी एक वेगळीच पद्धत वापरली आहे. त्यांनी आवाहन केले आहे की जर कोणी हे सिद्ध केलं की चिकन खाल्ल्याने कोरोना होतो तर त्याला 5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

कोरोनाच्या भीतीमुळे मागणीत घट –
हे आवाहन पुण्यातील प्रसिद्ध आमिर चिकन सेंटरकडून करण्यात आली आहे. आमिर चिकन सेंटरचे संपूर्ण पुण्यात एक डझन पेक्षा जास्त चिकन शॉप आहेत. चिकन सेंटरचे ओनर संजय मोरे म्हणाले, कोरोनाच्या भीतीमुळे त्याना बराच तोटा होत आहे. लोक भीतीपोटी चिकन खरेदी करणं टाळत आहेत. यामुळे लोकांची भीती कमी करण्यासाठी आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी ही युक्ती लढवली आहे. ते म्हणाले, चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही. चिकन तयार करताना उच्च तापमानात ते शिजवले जाते, त्यामुळे ही अफवा आहे.

आमिर चिकन सेंटरच्या या आवाहनानंतर देखील चिकन विक्री वाढली नाही. पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये 19 प्रकरणं समोर आली आहेत, लोक घाबरलेले आहेत आणि घरातच राहणे पसंत करत आहेत.