Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-क्राईम ब्रँच न्यूज : पिंपरी मार्केट येथील व्यापार्‍याकडे खंडणी मागणार्‍याला अटक

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँचने पिंपरी मार्केटमधील (Pimpri Market) कापड व्यापार्‍याकडे खंडणी मागणार्‍याला (Extortion Case) अटक केली आहे. त्याच्याविरूध्द पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये (Pimpri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News)

माधव उर्फ उमाकांत भगवान वाघमारे Madhav alias Umakant Bhagwan Waghmare
(18, रा. पत्राशेड लिंकरोड, जलशुध्दीकरण पंपाजवळ, चिंचवड, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
त्याच्यासह आतिश शिरसाट आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात 33 वर्षीय कापड व्यापार्‍याने पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 8 फेब्रुवारी ते दि. 14 एप्रिल 2023 दरम्यान आरोपी माधव वाघमारेने फिर्यादीच्या दुकानात वेळावेळी येवून तुला कापड दुकान (Cloth Shop) चालवायचे असेल तर मला दर महिन्याला 10 हजार रूपयाचा हप्ता द्यावा लागेल, हप्ता दिला नाही तर दुकानासह जाळुन टाकतो अशी धमकी दिली आणि 500 रूपयाचा हप्ता घेतला. आरोपी आतिश शिरसाटने फिर्यादीच्या दुकानातील 1350 रूपये किंमतीचे 3 शर्ट जबरदस्तीने घेवून त्यांना 10 हजार रूपयाची खंडणी (Ransom) मागितली तसेच त्यांना मारहाण केली.

कापड व्यापर्‍याने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police)
गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. त्यानंतर खंडणी विरोध पथकाने
(Anti Extortion Cell Pimpri) आरोपी माधव वाघमारेला अटक केली.
त्याच्यासह इतरांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डोंब (API Domb) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | Pimpri Chinchwad Crime Branch Police Arrested Man Who demanding extortion from a trader at Pimpri Market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 3 सट्टेबाजांना तळेगाव दाभाडेमध्ये अटक (Video)

Gulabrao Patil | ‘चौकटीत राहून बोलावं, नाहीतर पाचोऱ्याच्या सभेत घसून…’, गुलाबराव पाटलांचा इशारा

Congress Leader Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, सूरत न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली