Pune Pimpri Chinchwad Crime | लग्न समारंभात सीडीआर डाटा प्रसारित करण्याची धमकी देत महिलेकडे मागितली खंडणी, वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | डाटा (Data) व सीडीआर डाटा (CDR Data) लग्न समारंभात स्क्रीनवर दाखवुन बदनामी करण्याची धमकी (Threat of Defamation) देऊन महिलेकडे एक लाखाची खंडणी (Extortion) मागितल्याच प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Chinchwad Crime) अज्ञात मोबाईल धारका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 फेब्रुवारी रात्री साडे आठ ते 5 फेब्रुवारी रात्री बाराच्या दरम्यान घडला.

याबाबत 32 वर्षीय महिलेने सोमवारी (दि.6) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7488842680 क्रमांकाच्या मोबाईल धारकावर आयपीसी 384 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 7488842680 या अनोळखी क्रमांकावरुन फोन आला.
फोन करणाऱ्या व्यक्तीने फिर्यादी यांना तुमचा डाटा व सिडीआर डाटा आपल्याकडे असल्याचे सांगितले.
तसेच हा डाटा फिर्यादी यांच्या पतीकडे व नातेवाईकांकडे 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लग्न समारंभात
स्क्रीनवर प्रसारित करण्याची धमकी दिली. डाटा प्रसारित करायचा नसेल तर सुरुवातीला 50 हजार आणि
त्यानंतर एक लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी सोमवारी वाकड पोलीस अज्ञात व्यक्ती विरुद्ध
फिर्य़ाद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. लोहार (API A.P. Lohar) करीत आहेत.

Web Title :-Pune Pimpri Chinchwad Crime | Extortion demanded from woman threatening to broadcast CDR data during wedding ceremony, incident in Wakad area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vaalvi 2 | परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांची मोठी घोषणा; ‘वाळवी 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Kasba Constituency Bypolls | जाणून घ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे शिक्षण आणि संपत्ती