Pune Pimpri Chinchwad Crime News | फ्लॅट देण्याच्या बहाण्याने साडे 12 लाखांची फसवणूक, एकाला अटक; चिंचवडमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सदनिका देण्याच्या बहाण्याने 25 लाख रुपये घेऊन सदनिकेची परस्पर विक्री करुन साडे बारा लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (PCPC Police) एका व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार सन 2018 ते गुरुवार (दि.14 नोव्हेंबर) दरम्यान समृद्धी वर्षा बिल्डिंग चिंचवड येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सुरज विश्वनाथ पाटील Suraj Vishwanath Patil (वय-32 रा. मु.पो. कामठी खुर्द, ता. मोहोळ जि. सोलापूर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुधीर विष्णु वाडेकर Sudhir Vishnu Wadekar (वय-28 रा. विकासनगर, किवळे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना चिंचवडमध्ये सदनिका खरेदी करायची होती.
आरोपी सुधीर वाडेकर याने फिर्यादी यांना चिंचवड येथील समृद्धी वर्षा बिल्डिंगमधील (Samriddhi Varsha Building)
फ्लॅट नं. 702 देतो असे सांगितले. यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून ऑनलाईन आणि रोखीने 25 लाख रुपये घेतले.
यानंतर फ्लॅट फिर्यादी यांच्या नावावर करुन देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना दाखवलेला
फ्लॅट रणजित सावंत आणि अस्मिता सावंत यांना परस्पर विकला. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीकडे पैशांची मागणी
केली असता त्याने साडे बारा लाख रुपये परत केले. मात्र, उरर्वरित साडे बारा लाख रुपये परत न करता तसेच सदनिकेचा
ताबा न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

धक्कादायक! पत्नी WhatsApp वर चॅटिंग करते म्हणून गळफास देऊन जीवे मारण्याचा केला प्रयत्न, औंध मिलिटरी कॅम्पमधील प्रकार

Manoj Jarange Patil | ”फडणवीस त्यांना बोलायला लावतात, म्हणून ते बोलतात”, नितेश राणेंच्या टीकेवर जरांगेंचे प्रत्युत्तर, सरकारला दिला इशारा

Pune Police MCOCA Action | फटाके फोडण्यावरुन तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या फहीम खान टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 98 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

NEMS School Pune | युद्धकला आणि शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकानी रंगला एन.ई.एम.एस. शाळेचा वार्षिक क्रीडा दिन 850 विद्यार्थांनी घेतला सहभाग