Pune Pimpri Chinchwad Crime News | ऑनलाईन टास्क फ्रॉड करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून 14 जणांना अटक
95 बनावट बँक अकाउंट उघडल्याचे निष्पन्न, 200 कोटींची फसवणूक, 17 गुन्हे उघड
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | टेलिग्रामद्वारे पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने टास्क पूर्ण (Online Task Fraud) केल्यास जास्त फायदा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून हिंजवडी येथील एका महिलेला 71 लाख 82 हजार 520 रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने (Pimpri Chinchwad Crime Branch Unit-4) आंतरराज्य टोळीला अटक केली आहे. या टोळीने ऑनलाईन टास्क फ्रॉड करण्यासाठी 95 बनावट बँक अकाउंट (Fake Bank Account) उघडल्याचे तपासात निष्पन्न झाले असून 17 गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) दाखल असलेला गुन्हा हा गंभीर व तांत्रिक स्वरुपाचा असल्याने तपासासाठी युनिट चार कडे वर्ग करण्यात आला होता. युनिट चारच्या पथकाने गुन्ह्यात फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले त्या बँक खात्याबाबत माहिती घेतली. तसेच सखोल तांत्रिक विश्लेषण करुन यातील आरोपींचा शोध घेऊन 14 जणांना विविध राज्यातून अटक (Arrest) केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
अशी करत होते फसवणूक
तपासामध्ये आरोपींनी तीन पद्धतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पहिल्या स्तरावर यातील आरोपी हे गरीब गरजू व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत अकाऊंट व फर्म तयार करत होते. दुसऱ्या स्तरावर आरोपी तयार केलेल्या बँक खाते व किट चेकबुक व इंटरनेट बँकींग विकत घेत होते. तर तिसऱ्या स्तरावरील आरोपी हे व्हॉट्सअॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करत होते. त्यांना ऑनलाईन टास्क देऊन त्याच्या मोबदल्यात पैशांचे आमिष दाखखून तयार केलेल्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत होते.
येथून केली अटक
गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. या पथकाने मध्य प्रदेशातील इंदौर, रतलाम, भोपाळ, राजस्थान राज्यातील जयपुर, उदयपुर, भिलवडा, गुजरात राज्यातील वडोदरा, बिहार राज्यातील पाटणा येथून आरोपींना अटक केली.
अटक केलेल्या आरोपींची नावे
चिंतन शशिकांत फडके (वय-35 रा. निहालपुर मुंडी, इंदौर, मध्य प्रदेश), ब्रजराज रामरतन वैष्णव (वय-18 रा. भिलवाडा, राजस्थान), सुंदरदास चेतनदास सिंधी (वय-24 रा. गुलाबपुरा, राजस्थान), राजेश भगवानदार करमानी (वय-26 रा. अजमेर, राजस्थान), अभिषेक सत्यनारायण पाराशर (वय-24 रा. अजमेर), नवीनकुमार नेवन्दराम आसनाणी (वय-40 रा. भिलवाडा, राजस्थान), विकास सत्यनारायण पारिख (वय-29 रा. भिलवाडा, राजस्थान), सुरेश गोवर्धनदास सिंधी (वय-32 रा. गुलाबपुरा, राजस्थान), ललित नवरतन मल पारिक (वय-33 रा. भिलवाडा), मनिष ऋषिकेश वैष्णव (वय-33 रा. भिलवाडा, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
200 कोटींची फसवणूक
आरोपींनी देशभरातील विविध मोठ्या शहरामध्ये जाऊन तेथे नोकरीच्या आमिषाने स्थानिक किंवा त्याच्यासह आलेल्या व्यक्तीच्या नावाने गाळा भाड्याने घेऊन फर्म तयार करत होते. यानंतर वेगवेगळ्या नावाने खाजगी बँकेमध्ये करंट अकाउंट उघडत होते. आरोपींकडून निष्पन्न झालेल्या विविध अकाउंटमधून जवळपास 200 कोटींच्या फसवणुकीचे व्यवहार झाले आहेत. हे सर्व अकाउंट फ्रिज करुन त्याली मनी ट्रेलचे विश्लेषण करुन फिर्यादी यांना पैसे परत मिळवून देण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
हिंजवडी पोलीस स्टेशन – 2, चिंचवड पोलीस स्टेशन -2, अवधुत वाडी पोलीस स्टेशन -2, पुर्व विभाग सायबर पोलीस ठाणे – 2, सेंट्रल सायबर पोलीस ठाणे-1, सायबर क्राईम पोलीस ठाणे, हावडा – 2, वाकड, पिंपरी, आळंदी, चिखली, दक्षिण सायबर विभाग पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 17 गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे
(Joint CP Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore) , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने
(ACP Satish Mane), सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर (ACP Balasaheb Kopner) यांच्या
मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे (Sr PI Shankar Avatade),
सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, आबासाहेब किरनाळे,
पोलीस अंमलदार नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिळाळ, प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ,
रोहिदास आडे, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, सायबर सेलचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे (Cyber Cell Sr PI Vaibhav Shingare), सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद,
पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस अंमलदार नागेश माळी, नितेश बिचेवार, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा