Pune Pimpri Chinchwad Crime News | भिशीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वकिलासह नागरिकांची 16 लाखांची फसवणूक, राजरत्न चिटफंडच्या दोन संचालकांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चिटफंड मधील भिशीमध्ये गुंतवणूक (Investment In Chitfund Bhishi) करण्यास सांगून भिशीची मुदत संपल्यानंतर पैसे परत न करता वकिलासह नागरिकांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजरत्न चिटफंडच्या (Rajratna Chitfund) दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान पुर्णानगर, चिखली येथील चिटफंडच्या कार्यालयात घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अ‍ॅड. गणेश रामभाऊ राऊत (वय-34 रा. गवळी नगर, टेल्को रोड, भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजरत्न चिटफंड प्रा. लि. चे संचालक संतोष रामदास बरबडे Santosh Ramdas Barbade (वय-39 रा. संतनगर मोशी प्राधिकरण, मोशी) व एका महिलेवर आयपीसी 406, 420, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधाचे रक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संतोष बरबडे याला अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे राजरत्न चीटफंड प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत.
आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी राऊत व इतर नागरिकांना चीटफंड मधील भिशीच्या योजनेची माहिती देऊन
त्यांना भिशीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच गुंतवलेल्या रक्कमेवर लाभांश देण्याचे आमिष दाखवले.
फिर्यादी व इतर नागरिकांनी आरोपींच्या सांगण्यावरुन राजरत्न चिटफंड मधील भिशी योजनेत गुंतवणूक केली.
भिशीची मुदत संपल्यानंतर फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने न वटणारे धनादेश दिले.
आरोपींनी एकूण 16 लाख 33 हजार 800 रुपये रकमेचा अपहार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुदळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने महिला डॉक्टरची 89 लाखांची फसवणूक, बिल्डर विरोधात FIR; चिंचवडमधील प्रकार

गहाण ठेवलेली गाडी परत न करता महिलेची फसवणूक, वाकडमधील प्रकार

Drowning In Bhima River | पुण्यातील दुर्दैवी घटना ! गुऱ्हाळावर काम करणाऱ्या 3 परप्रांतिय मुलांचा भीमा नदीत बुडून मृत्यू