Pune Pimpri Chinchwad Crime News | शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे आमिष दाखवून २३ लाखांची फसवणूक

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाईन शेअर ट्रेडिंग (Share Trading) शिकविण्याचा बहाणा करुन शेअर्स व आयपीओ मध्ये गुंतवणुक (Investment) करण्यास सांगून तब्बल २३ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ADV

याप्रकरणी वडगाव येथील एका ४१ वर्षाच्या तरुणाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात Sinhagad Road Police Station (गु. रजि. नं. ५६/२४) फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटसअप ग्रुप वरील विविध नंबर, विविध बँक धारका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्याशी व्हॅटसॲपवरुन संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक कशी करायची हे शिकविण्याचा बहाणा केला. शेअर्स व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगितले. त्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. आणखी पैसे मिळतील असे आमिष दाखवून फिर्यादी यांना २३ लाख ६६ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस निरीक्षक राजूरकर अधिक तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक