Pune Pimpri Chinchwad Crime News | डेन्मार्कला नोकरीच्या आमिषाने २८ लाखांना घातला गंडा; मॅनेजर बनण्याचे स्वप्न राहिले दूर, बँक खाते झाले रिकामे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेन्मार्क येथील कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मॅनेजरपदासाठी निवड झाल्याचे सांगून त्यांना व्हिसा व विविध प्रक्रियेसाठी पैशांची मागणी करुन तब्बल २८ लाख ६९ हजार रुपयांना गंडा (Cheating Fraud Case) घालण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी वाघोलीमधील एका ५५ वर्षाच्या नागरिकाने लोणीकंद पोलिसांकडे (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७५/२४) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ई मेल आयडीवर डेन्मॉर्क सीजी जेन्ससन कन्स्ट्रक्शन कंपनी जॉब पोर्टल या नावाने मेल आला. कंपनीत सर्व्हिस टेक्नीकल मॅनेजर पदासाठी फिर्यादी यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांची निवड झाल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. फिर्यादी व फिर्यादी यांची पत्नी यांचा व्हिसा प्रक्रिया व व्हॅलिडेशन तसेच इतर कारणे सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास सांगितले गेले. त्यांनी ते सांगतील त्यानुसार एकूण २८ लाख ६९ हजार २९० रुपये पाठविले. तरीही त्यांची पैशांची मागणी सुरु राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक