Pune Pimpri Chinchwad Crime News | पीडब्ल्युडीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक, एकाला अटक; तळेगाव मधील प्रकार

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पी.डब्ल्यु.डी (PWD) खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाची पाच लाखांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) करणाऱ्या एकाला तळेगाव पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत प्रमोद पंढरीनाथ चौधरी (वय-66 रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कैलास विश्वनाथ भालेराव Kailas Vishwanath Bhalerao (वय-36 रा. यश अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास भालेराव याने फिर्यादी यांचा मुलगा निलेश चौधरी याला पी.डब्ल्यु.डी
खात्यात नोकरी लावतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. यानंतर नोकरी लावण्यासाठी 22 फेब्रुवारी ते
12 ऑगस्ट 2021 या कालावधीत 5 लाख 7 हजार रुपये आरोपीने फिर्यादी यांच्याकडून घेतले.
पैसे घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला नोकरी लावली नाही.
त्यामुळे चौधरी यांनी आरोपीकडे वारंवार पैशांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे परत करण्यास टाळाटाळ करुन फिर्यादी
यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | मोठी बातमी! ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड, आमदार रोहित पवार अडचणीत

जमीन देण्याच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक, खराडी परिसरातील प्रकार

Firing On Sharad Mohol In Kothrud Pune | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गोळीबार, एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

पुणे: तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची दीड कोटींची फसवणूक, तिघांवर FIR