Pune Pimpri Chinchwad Crime News | चार सराईत गुन्हेगारांकडून 5 पिस्टल 10 काडतुसे जप्त, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Police) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pimpri (AEC Pimpri) चार सराईत गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून 5 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे (Pistol Seized) जप्त केली आहेत. ही करावाई रहाटणी येथील जगताप डेअरी (Jagtap Dairy) चौकातील ब्रिजच्या खाली करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अस्लम अहमद शेख (रा. पवार गल्ली, थेरगाव), सचिन उत्तम महाजन (रा. मु.पो. सुरवड, ता. इंदापूर), संतोष विनायक नातु (रा. महर्षीनगर, झांबरे पॅलेसजवळ, स्वारगेट, पुणे), राहुल उर्फ खंडु गणपत ढवळे (रा.विठ्ठल मंदिराजवळ, मु.पो. पिंपळगाव ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर वाकड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पथकातील पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, गणेश गिरीगोसावी व विजय नलगे यांना माहिती मिळाली की, जगताप डेरी चौकात एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अस्लम शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्टल जप्त केले.

दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पिस्टल विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 4 पिस्टल व 10 जिवंत काडतुसे जप्त केली. या गुन्ह्यात आता पर्यंत 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सचिन महाजन, संतोष नातु व राहुल ढवळे हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध पुणे शहर, पुणे ग्रामीण व सोलापूर येथे दरोडा, खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सचिन महाजन याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तर संतोष नातु याच्यावर पुणे शहर येथे तडीपार कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Chaubey IPS),
सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (IPS Dr Sanjay Shinde),
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi),
पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore),
सहायक पोलीस आयुक्त सतिश माने (ACP Satish Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार (Sr PI Arvind Pawar),
सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे (API Uddhav Khade), सहायक पोलीस उप निरीक्षक रमेश गायकवाड,
अमर राऊत, पोलीस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, सुनिल कानगुडे, किरण काटकर,
प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, प्रदीप गायकवाड, शैलेश मगर, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस, प्रदीप गुट्टे, भरत गाडे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai | ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत वादंग?