Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरुन तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण; येरवडा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तीन भावांनी एका तरुणाला लाकडी बांबू व लोखंडी पाईपने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे. हा प्रकार येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथील बुद्ध विहाराच्या मागे सोमवारी (दि.5) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तीन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबतत गौरव मनोज धुमाळ (वय-18 रा. बुद्ध विहारच्या मागे, लक्ष्मीनगर, येरवडा) याने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अजमेर नुर मोहम्मद शेख, हैदर नुर मोहम्मद शेख, शब्बीर नुर मोहम्मद शेख (सर्व रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव हा त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपी अजमेर तिथून जात होता. गैरव याने त्याला हाक मारली.

आरोपी अजमेर शेख हा फिर्यादी याच्या जवळ आला. त्याने मला का बोलवले असे म्हणत शिवीगाळ केली.
फिर्यादी यांनी शिव्या का देतो अशी विचारणा केली. याचा राग आल्याने त्याने दोन भावांना बोलावून घेतले.
त्यांनी गौरव याला लाकडी बांबूने व लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीच्या मित्राला
देखील धक्काबुक्की केल्याने त्याच्या डोळ्याला दुखापत केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण, दोघांना अटक; हडपसर परिसरातील घटना

Latur Crime News | पोलीस ठाण्यात अधंश्रद्धेचा धक्कादायक प्रकार, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी चक्क बोकडाचा बळी; बिर्याणीही बनवून खाल्ली