Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरुन मारहाण करण्याच्या घटना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये वाढत आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका तरुणावर कोयत्याने (Koyta Attack) वार केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.3) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथील पवना नगर येथे घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत राहुल सुनिल मोरे (वय-23 रा. मानसी अपार्टमेंट, पवना नगर, पिंपळे गुरव) याने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून अथर्व शशिकांत देशपांडे (रा. देशपांडे संकुल, पिंपळे गुरव) याच्यावर आयपीसी 326, 323 सह आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल मोरे आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते.
बुधवारी दुपारी राहुल पवना नगर येथील सार्वजनिक रोडच्या कडेला साहिल शिंदे व जेम्स सांदप्पन यांच्यासोबत गप्पा
मारत थांबला होता. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला.
त्याने जुन्या भांडणाच्या रागातून राहुल याच्या डोक्यात पाठीमागून कोयत्याने वार केला.
यामध्ये राहुल मोरे हा गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवारी (PSI Gawari) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar | ‘गृहमंत्र्यांनी या महाशयांवर कठोर कारवाई करावी’, रुपाली चाकणकरांचा आव्हाडांवर संताप

NCP Chief Sharad Pawar | ”मोदी सांगतात गॅरंटी, पण ती काही खरी नाही…”, शरद पवारांची खोचक टिका

Pune PMC News | पुणे महापालिकेने नोटीसेस दिलेल्या अनधिकृत बांधकामांचे व्यवहार करु नयेत; असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटस् संघटनेचे सदस्यांना आदेश