Rupali Chakankar | ‘गृहमंत्र्यांनी या महाशयांवर कठोर कारवाई करावी’, रुपाली चाकणकरांचा आव्हाडांवर संताप

पुणे : Rupali Chakankar | शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) श्रीरामाबद्दल (Ram Non Vegetarian) केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटत असून भाजपा, शिंदे गट (Shinde Group) आणि अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) आव्हाडांवर चौफेर टीका सुरू केली आहे. आता महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही आव्हाडांवर संताप व्यक्त केला आहे.

रुपाली चाकणकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डीमधील शिबिरात विचारांची ज्योत पेटवायची सोडून धार्मिक विखारांनी आग लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांनी केले. ज्या पवित्र भूमीत सर्व धर्मातील भाविक दर्शनाला येतात. त्या ठिकाणी दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम केले आहे.

चाकणकर यांनी पुढे म्हटले आहे की, मागे पोपटपंची करताना हेच महाशय म्हणाले होते, हे वर्ष दंगलींचे वर्ष असेल.
त्या वाक्याला खरे करण्यासाठी तर हा आटापिटा सुरू नाही ना? महाराष्ट्र शांत आहे, शांतच राहू द्या.

चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटले आहे की, लोकांना प्रभू श्रीरामबद्दल प्रेम आहे, त्यामुळे मुद्दाम बोलून
लोकांच्या भावना भडकवण्याचे राजकारण बंद करा. उद्या महाराष्ट्रात काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला
तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन या महाशयांवर कठोर कारवाई करावी.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड
पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे.
राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात.
मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत.
१४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Amol Kolhe | भाजपा-शिंदे-पवार गटावर अमोल कोल्हेंचा निशाणा, ”रामायणात सीतामाईचं, तर कलियुगात पक्ष-चिन्हाचं अपहरण”

IPS officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Pune Municipal Corporation (PMC) | अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ 11 जणांवर गुन्हा दाखल करा, पुणे मनपाचे भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतूस जप्त