Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट कागदपत्रांद्वारे महाराष्ट्रात चारचाकी विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

ADV

आंतरराज्यीय टोळीमध्ये सांगली पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा समावेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दिल्ली येथून चोरी केलेल्या महागड्या चारचाकी गाड्यांचे बनावट कागदपत्र (Fake Document) तयार करुन महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून एक कोटी 57 लाख रुपये किंमतीच्या 11 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. टोळीमध्ये सांगली पोलीस (Sangli Police) दलात कार्य़रत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अजीम सलीम पठाण (वय-34 मु.पो. रहिमतपूर , ता. कोरेगाव जि. सातारा), शशिकांत प्रताप काकडे (वय-30 रा. मु.पो. साखरवाडी (पिंपळवाडी) ता. फलटण, जि. सातारा), राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडकर (वय 34 रा. पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर जि. सोलापुर), महेश भिमाशंकर सासवे (वय-31 रा. विजापुर रोड, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रशांत माने (रा. रहीमतपुर), विकास माने (रा. रहीमतपुर), भरत खोडकर (रा. सांगली), हाफिज (रा. मेरठ, उत्तर प्रदेश), इलियास (रा. बेंगलोर), रसुल शेख (रा. इचलकरंजी) अशी आंतरराज्यीय वाहन चोरांची टोळी निष्पन्न झाली आहे. यातील भारत खेडकर हा सांगली जिल्ह्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ADV

दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना सहायक पोलीस फौजदार महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना मिळालेल्या माहितीवरुन 5 जानेवारी रोजी हिंजवडी परिसरातून अजीम पठाण व शशीकांत काकडे यांना ताब्यात घेतले. अजीम पठाण याच्याकडून चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील इको गाडी आणि काकडे याच्याकडून ब्रेझा गाडी जप्त केली. अजीम पठाण हा सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अजीम पठाण आणि शशिकांत काकडे या दोघांनी मिळून आंतरराज्य गुन्हेगारी टोळीच्या मदतीने परराज्यातून चोरून आणलेल्या 1 कोटी 57 लाख रुपये किंमतीच्या 11 चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.

जप्त केलेली वाहने

आरोपींनी मुखर्जी नगर पोलीस ठाण्याच्या (दिल्ली) हद्दीतून 15 लाख रुपये किमतीची सेल्टोस (एचआर 06 एवाय 4245),
हरिनगर पोलीस ठाण्याच्या (दिल्ली) हद्दीतून 9 लाख रुपये किमतीची ब्रेझा (डीएल 01 सीएबी 8291), अरसीकेअर
शहर पोलीस (कर्नाटक) ठाण्याच्या हद्दीतून 4 लाख रुपये किमतीची इको (केए 13 झेड 5855), चाकण पोलीस ठाण्याच्या
हद्दीतून 4 लाख रुपये किमतीची इको (एमएच 14 जेएन 8650), मोर्य एन्क्लेव्ह पोलीस ठाण्याच्या (दिल्ली) हद्दीतून 10
लाख रुपये किमतीची आय 20 (डीएल 8 सीबीएफ 6345), राणीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 20 लाख रुपये किमतीची क्रेटा
(एच आर 8 डी 1582), शांकरपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 20 लाख रुपये किमतीची क्रेटा (आरजे 34 सीबी 3434), बिरसत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 10 लाख रुपये किमतीची ब्रेझा (युपी 16 सीएच 6742), मॉडेल टाऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 20 लाख रुपये किमतीची क्रेटा (डीएल 1 सीएसी 6307), शिवपुरी पोलीस ठाण्याच्या (मध्यप्रदेश) हद्दीतून 20 लाख रुपये किमतीची क्रेटा (एमपी 07 सीएच 6529), सुभाष प्लेस पोलीस ठाण्याच्या (दिल्ली) हद्दीतून 25 लाख रुपये किमतीची इनोव्हा (एचआर 26 डीके 9132) या गाड्या जप्त केल्या आहेत.

आरोपीचा विमानाने प्रवास

आरोपी अजिम पठाण याला 2023 मध्ये सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती.
त्यावेळी त्याच्याकडून 9 चारचाकी गाड्या जप्त केल्या होत्या. आरोपी अजीम पठाण हा दिल्ली येथे विमानाने जात होता.
त्याठिकाणी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने वाहन चोरी करुन महाराष्ट्रात कमी किंमतीत वाहन विक्री करत होता.
त्यासाठी खरेदी करणाऱ्यांना खोटी कागदपत्रे देत होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत,
सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे,
उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, प्रवीण माने, सागर शेडगे,
प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, चिंतामण सुपे,
तांत्रिक विभागाचे पोलीस अंमलदार माळी, हुलगे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Srinivas Patils Wife Rajni Devi Passes Away | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन

PM Narendra Modi In Maharashtra | PM मोदींचा आज झंझावाती महाराष्ट्र दौरा, नाशिकमध्ये रोड शो, नवी मुंबईत अनेक कामांचे उद्घाटन

Ajit Pawar On Katraj Dairy Playgrounds Reservation | कात्रज डेअरी मैदान आरक्षण उठवण्याबद्दल माहिती घेऊन सांगतो – उपमुख्यमंत्री अजित पवार

PM Narendra Modi in Maharashtra | मोदींचा तरुणांना सल्ला, ”तुमच्या पॉलिटिकल व्हुयजपेक्षा तुमचं मतदान जास्त महत्त्वाचं”, घराणेशाहीवर केला हल्लाबोल!

सोन्याच्या दुकानात दरोडा घालणाऱ्या कामगारासह इतर आरोपींना फरासखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ३ किलो ४८० ग्रॅम सोने व रोख रक्कम जप्त