Ajit Pawar On Katraj Dairy Playgrounds Reservation | कात्रज डेअरी मैदान आरक्षण उठवण्याबद्दल माहिती घेऊन सांगतो – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | विकास आराखड्यात कात्रज गावठाण येथे टाकलेल्या मैदानाचे आरक्षण रद्द (Ajit Pawar On Katraj Dairy Playgrounds Reservation) करून ३.५९१ हेक्टर जागा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला देण्याच्या महापालिकेच्या निर्णयाबाबत मला काहीही माहिती नाही, असे म्हणत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानावर हात ठेवले. (Ajit Pawar On Katraj Dairy Playgrounds Reservation)

जिल्हा नियोजन समिती बैठकीसाठी पवार गुरुवारी येथे आले होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी वरील स्पष्टीकरण दिले. अजित पवार म्हणाले, की महापालिका आयुक्त विक्रमकुमार स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारानिमित्त दिल्ली येथे गेले आहेत. ते पुण्यात परतल्यानंतर मी त्यांच्याशी बोलून सर्व प्रकरण जाणून घेईन आणि त्यानंतरच पत्रकारांशी बोलेन, अशी प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात हात झटकले.

कात्रज येथील सर्वेक्षण क्रमांक १३२ (पार्ट) ते १३३ (पार्ट) या दरम्यानचा भूखंडावर मैदानाचे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले होते. हा भूखंड ३.५९१ हेक्टर एवढा असून, तो पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघालगत (कात्रज दूध डेअरी) आहे. या भूखंडावरील मैदानाचे आरक्षण काढून ती जागा कात्रज दूध डेअरी आणि प्रक्रिया उद्योगासाठी द्यावी, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२१ मध्ये दिले होते. त्यानुसार शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मैदानाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मैदानाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्या संदर्भात हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. या निर्णयाला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आणि आम आदमी पक्षाने विरोध दर्शविला आहे. त्याबाबतची लेखी हरकत महापालिका प्रशासनाला देण्यात आली असून, विकास आराखड्यातील मैदानाचे आरक्षण कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi In Maharashtra | PM मोदींचा आज झंझावाती महाराष्ट्र दौरा, नाशिकमध्ये रोड शो, नवी मुंबईत अनेक कामांचे उद्घाटन

पुणे : मोठा फायदा करुन देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, दोघांवर FIR

पुणे : रेल्वे, पुणे मनपामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक, दाम्पत्यावर FIR

येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगाराचा भररस्त्यात वाढदिवस साजरा, पाच जण ताब्यात; जनवाडी परिसरातील घटना

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, बापावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा; हडपसर परिसरातील घटना

पुणे : दीड वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Pune News | राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी लढण्याची प्रेरणा दिली – चंद्रकांत पाटील

Beed News | जाळपोळ करणार्‍या गुंडावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात केली रवानगी