PM Narendra Modi in Maharashtra | मोदींचा तरुणांना सल्ला, ”तुमच्या पॉलिटिकल व्हुयजपेक्षा तुमचं मतदान जास्त महत्त्वाचं”, घराणेशाहीवर केला हल्लाबोल!

नाशिक : घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान झाले आहे. लोकशाहीमध्ये सहयोगाचा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकार म्हणजे तुमचे मत मतदानाच्या रुपाने द्यायचे आहे. फर्स्ट टाईम व्होटर्स आपल्या लोकशाहीत नवी उर्जा आणि शक्ती आणतील. मतदार यादीत नाव येण्यासाठी लवकर प्रक्रिया पूर्ण करा. तुमच्या पॉलिटिकल व्हुयजपेक्षा (Political Views) तुमचे मतदान जास्त महत्त्वाचे आहे. हा अमृतकाल तुमच्यासाठी कर्तव्यकालसुद्धा आहे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in Maharashtra) यांनी नाशिक येथे बोलताना तरूणांना दिला.

केंद्र आणि राज्य सरकारच्या युवक आणि क्रीडा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (27th National Youth Festival) उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अमृतकाळातील तरुण पिढीवर माझा विश्वास आहे. देशात अशी युवापिढी तयार होतेय जी गुलामीचा दबाव आणि प्रभावापासून मुक्त आहे. भारताची युवा पिढी आयुर्वेदाचे ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे.

तरुणांना आवाहन करताना मोदीजी म्हणाले, आजी-आजोबांना विचारा ते सांगतील, त्यांच्या काळात जेवणात
बाजरीची भाकरी, कुटकी, रागी, ज्वारी असायची. पण गुलामीच्या मानसिकतेत या अन्नाला गरिबीसोबत जोडले गेले.
ते स्वयंपाकघरातून बाहेर काढले गेले. हेच अन्न आता मिलेट्सच्या रुपात, सुपर फूडच्या रुपात पुन्हा स्वयंपाकघरात पोहोचत आहे.

सरकारने या मिलेट्सना श्री अन्नच्या रुपाने नवी ओळख दिली आहे. आता तुम्हाला श्री अन्नचा ब्रॅण्ड अम्बेसेडर बनायचे आहे.
यामुळे तुमचे आरोग्यही सुधारेल. देशातील शेतकऱ्यांचेही भले होईल, असे मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी तरूणांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला राजकीय माध्यमातूनही देशाची सेवा करता येईल.
मी जेव्हा ग्लोबल लीडर किंवा इनोव्हेटर्सना भेटतो तेव्हा त्यांच्यात एक अद्भूत आशा दिसते.
आशा आणि आकांक्षाचे एक कारण लोकशाही आहे. भारत लोकशाहीची जननी आहे.
लोकशाहीत तरुणांचा सहभाग जेवढा जास्त तेवढे राष्ट्राचे भविष्य चांगले असेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi In Maharashtra | PM मोदींचा आज झंझावाती महाराष्ट्र दौरा, नाशिकमध्ये रोड शो, नवी मुंबईत अनेक कामांचे उद्घाटन

पुणे : मोठा फायदा करुन देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, दोघांवर FIR

पुणे : रेल्वे, पुणे मनपामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक, दाम्पत्यावर FIR

येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगाराचा भररस्त्यात वाढदिवस साजरा, पाच जण ताब्यात; जनवाडी परिसरातील घटना

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, बापावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा; हडपसर परिसरातील घटना

पुणे : दीड वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Pune News | राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी लढण्याची प्रेरणा दिली – चंद्रकांत पाटील

Beed News | जाळपोळ करणार्‍या गुंडावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात केली रवानगी