Pune Pimpri Chinchwad Crime News | CA ने दिली मित्राला मारण्याची सुपारी, बंधकाम साईटवर मित्राचा गेम करण्याचा प्लान पोलिसांमुळे फसला; 3 पिस्टल 40 काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जमीन खरेदी-विक्रीच्या व्यासायिक कारणावरुन भागिदार मित्राला मारण्यासाठी मैत्रीणीच्या मदतीने एका सराईत गुन्हेगाराला 50 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (PCPC Police) गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) रेकॉर्डवरील गुन्हेगारासह चौघांना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका सनदी लेखपालचा (Chartered accountant (CA) समावेश आहे. त्यांच्याकडून 3 पिस्तुल आणि 40 काडतुसे जप्त केली आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सीए विवेक नंदकिशोर लाहोटी CA Vivek Nandkishore Lahoti (वय-42 रा. ए 1/2, एच.डी.एफ.सी. कॉलनी, शाहुनगर, चिंचवड, पुणे), सुधीर अनिल परदेशी Sudhir Anil Pardeshi (वय-25 रा. साईधाम सोसायटी, केशवनगर, वडगाव, ता. मावळ), शरद साळवी (Sharad Salvi) यांच्यासह एका महिलेला अटक केली आहे. पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला (Kishore Aware Murder Case) घेण्यासाठी रचलेल्या खुनाच्या कटाचा तपास सुरू होता. त्यावेळी दरोडा विरोधी पथकाने सोमाटणे फाटा येथून 3 जुलै 2023 रोजी अनिल परदेशी याला 2 पिस्टल आणि 16 काडतुसांसह अटक केली होती. त्याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास दरोडा विरोधी पथक करत होते. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी सुधिर परदेशी याने त्याचा साथीदार शरद साळवी याच्या मार्फत मध्य प्रदेशातून 3 गावठी पिस्टल (Pistol) आणि 40 काडतुसे (Cartridges) आणल्याचे सांगितले. यापैकी एक पिस्टल व 24 काडतुसे Chartered accountant (CA) विवेक लाहोटी याने स्वत:कडे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी लाहोटी याला चिंचवड येथील घरातून ताब्यात घेऊन 1 पिस्टल आणि 24 काडतुसे जप्त केली.

आरोपी सीएचा जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय

आरोपी सुधिर परदेशी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा आणि सीए लाहोटी याचा कसा काय संबंध आला, त्याने सीएकडे पिस्तूल का ठेवले, याबाबत पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी दरम्यान कसुन चौकशी केली. त्यावेळी सीए विवेक लाहोटी याचा जमिन खरेदी विक्रीच्या व्यवसायातील भागिदार राजु माळी Raju Mali (रा. सोमाटणे फाटा, मावळ) याचा खून (Murder) करण्यासाठी 50 लाखाची सुपारी दिल्याचे समोर आले.

मध्य प्रदेशातून आणले पिस्तूल

सीए विवेक लाहोटी याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. राजू माळी (रा. सोमाटणे फाटा, मावळ) हा त्याचा व्यावसायिक भागीदार आहे. राजू माळीसोबत झालेल्या व्यवहारातील गैरसमजुतीतून लाहोटी याने त्याच्या मैत्रिणीमार्फत राजू याला मारण्याची सुपारी परदेशी याला दिली. या कामासाठी परदेशी आणि साळवी यांनी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणि काडतुसे आणली.

साताऱ्यातील बांधकाम साईटवर मारण्याचा प्लान

राजु माळी हे दर शनिवार व रविवार सातारा जिल्ह्यातील त्यांच्या बांधकाम साईट येथे भेट देवु तेथेच मुक्काम करता ही बाब हेरून आरोपींनी त्याच ठिकाणी राजु माळी यांचा खून करण्याचा कट रचला. तसेच त्याठिकाणी रेकी करण्यासाठी भेटी दिल्या होत्या. आरोपी तेच ठिकाण निवडण्याचे कारण की, त्याठिकाणी काही घडल्यास पोलिसांना लवकर सुगावा लागणार नाही म्हणून ते ठिकाण निवडल्याचे तपासात समोर आले. मात्र, पोलिसांनी आरोपींचा कट उधळून लावला. पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख (API Ambarish Deshmukh) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), पोलीस सह आयुक्त संजय शिंदे
(Addl CP Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi), पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने (ACP Satish Mane), सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर
(ACP Balasaheb Kopner) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम (PI Jitendra Kadam),
सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत,
विनोद वीर, समिर रासकर, सुमित देवकर, महेश खांडे, सागर शेडगे, उमेश पुलगम, प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे,
नितीन लोखंडे, चिंतामण सुपे, अमर कदम यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime News | CA friend gave betel nut to kill his own friend 3 pistols with 40 cartridges seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा