Pune Pimpri Chinchwad Crime News | शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार, चाकणमधील घटना; एकाला अटक

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन तरुणाला घराच्या खाली बोलावून घेत त्याच्यावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना मेदनकरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.18) रात्री साडेसातच्या सुमारास बोरजाई नगर मेदनकरवाडी येथे घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

प्रितेश सुनील चव्हाण (वय-21 रा. श्रीरामनगर, शत्रुघ्न सोसायटी, चाकण, ता. खेड) याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदारावर आयपीसी 326, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धिरज शिवलिंग हाडवळे (वय-23 रा. बोरजाई नगर, मेदनकरवाडी) याने रविवारी (दि.19) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी फिर्य़ादी धिरज हा त्याच्या राहत्या घरी होता.
त्यावेळी प्रितेश याने धिरजला फोन करुन बिल्डिंगच्या खाली बोलावून घेतले.
धिरज बिल्डिंगच्या खाली आला असता अल्पवयीन मुलाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मला मोबाईलवर शिवी का दिली? असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी धिरज याने प्रतिकार केला असता अल्पवयीन मुलाने खिशातून चाकू काढून त्याच्या पायाच्या मांडीवर वार केला. त्यावेळी आरोपी प्रितेश चव्हाण हा बघत उभा राहिला. धिरज याने आरडाओरडा केला असता धिरज याचा भाऊ सुरज पळत आला. त्यावेळी प्रितेश आणि अल्पवयीन मुलगा गाडीवरून पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | तरुणीवर हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई!
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 60 वी स्थानबध्दतेची कारवाई

घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; 2 महिलांची सुटका, भोसरी परिसरातील प्रकार