Pune Pimpri Chinchwad Crime News | रागाने पाहिल्याने तरुणाच्या डोक्यात मारला कुकर, पाच जणांवर FIR; तळेगाव मधील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – रागाने का बघतो असे म्हणत पाच जणांच्या टोळक्याने एका ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच जवळ असलेल्या वडापावच्या गाड्यावरील कुकर डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि. 17) वराळे येथील एका हॉटेल समोर घडला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत करण चंद्रकांत माने (वय-25 रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ) यांनी गुरुवारी (दि.18) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गुरुदेव मराठे, रमजान फुटणकर, साहिल म्हाळसकर, मयुर मते, गोट्या मराठे (सर्व रा. वराळे) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 143, 147, 149 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3)/135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण माने हे त्यांच्या दुचाकीवरुन समता कॉलनी येथील घरी जात होते. त्यावेळी सावली हॉटेल समोर आरोपी गुरुदेव मराठे याने फिर्यादी यांची गाडी अडवली. तु आमच्याकडे रागाने का बघतो अशी विचारणा करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर इतर आरोपींनी देखील करण याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गोट्या मराठे याने बाजूला असलेल्या वडापावच्या हातगाडीवरील कुकर करण याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करुन शिवीगाळ करत दमदाटी केली. या मारहाणीत करण याच्या मानेवर, पाठीवर मुका मार लागला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | जीएसटीची रक्कम न भरता पावणे तीन कोटींची फसवणूक, एरंडवणे परिसरातील प्रकार

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : नरबळी द्यावा लागेल, अन्यथा मुलगा व पतीचा मृत्यू होऊन घराचा नायनाट होईल, 35 लाख उकळणाऱ्या मांत्रिकासह पाच जणांवर FIR