Pune Pimpri Chinchwad Crime News | डिपीचा फ्युज काढला अन सावत्र चुलत भावांमध्ये उडाला भडका; मारहाणीत ७० वर्षाच्या आजीसह सहा जण जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शेजारी शेजारी राहणार्‍या व जमिनीवरुन वाद असलेल्या सावत्र चुलत भावांमध्ये जमिनीवरुन वाद होत होते. त्यात सरकारी डीपी बंद केल्याने लाईट गेली. त्यावरुन दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत ७० वर्षाच्या आजीसह सहा जण जखमी झाले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत द्रौपादाबाई मारुती जाधव (वय ७०, रा. नेरे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रदीप पांडुरंग जाधव, शिवाजी पांडुरंग जाधव आणि पांडुरंग जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा मुलगा विशाल, त्याची पत्नी अनिता व मोठा मुलगा नवनाथ व त्यांची पत्नी सुनिता यांच्यासह नेरे येथे राहतात. त्यांच्या शेजारी सावत्र चुलत पुतण्या प्रदीप जाधव राहतो.
शेतीवरुन त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. फिर्यादी यांच्या शेतीत सामाईक सरकारी डिपी आहे. फिर्यादी यांनी भाड्याने दिलेल्या रुममधील वीजेची वायर कट झालयाने त्यांचा मुलगा विशाल याने शेतात असलेल्या डिपीचा फ्युज काढून लाईट बंद केली. त्यामुळे प्रदिप जाधव हा डिपीजवळ आला व लाईट का बंद केली असे म्हणून शिवीगाळ करु लागला. त्याने विशाल याला हाताने मारहाण केली. पायातील चप्पल काढून मारल्याने त्याचा ओठ फुटला. तेव्हा फिर्यादी व त्यांची सून भांडणे सोडविण्यासाठी गेले असताना प्रदिप याने फिर्यादी यांना लाकडी काठीने मनगटावर मारुन जखमी केले. अनिता हिला काठीने मारुन जखमी केली. त्याचा भाऊ व वडिल यांनीही येऊन मारहाण केली.

त्याविरोधात प्रदिप पांडुरंग जाधव (वय ४२, रा. नेरे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी विशाल मारुती जाधव, अनिता जाधव, सुनिता जाधव आणि मारुती दामु जाधव यांच्याविरुद्ध
गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दुकानाची वीज गेल्याने ते डिपीमधील फ्युज गेला आहे का हे पाहण्यासाठी
गेले होते. तेव्हा सावत्र चुलत भाऊ विशाल जाधव तेथे आला व म्हणाला तू आमच्या हद्दीत यायचे नाही.
त्यावर फिर्यादी म्हणाले की, माझ्या दुकानाची लाईट गेली आहे. डिपी सार्वजनिक आहे. त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली.
तेव्हा तेथे उभे असलेल्या मित्रांनी त्यांची भांडणे सोडवली.
थोड्या वेळाने त्यांच्या घराकडे आरडाओरडा झाल्याचा आवाज आला. ते दुकानातून घरी गेले.
तेव्हा फिर्यादी यांची आई, वडिल, पत्नी यांना विशाल जाधव, अनिता, सुनिता, सावत्र चुलते मारुती जाधव हे मारहाण
करत होते. फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असताना विशाल याने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली.
त्याने त्यांना चक्कर आली. फिर्यादी यांचा मोठा भाऊ शिवाजी जाधव यालाही विशालने लोखंडी रॉड डोक्यात मारुन
जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

अल्पवयीन मुलींकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी एकाला अटक, येरवडा परिसरातील घटना

Pune News | कात्रज डेअरीच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण!, ‘राजकिय व प्रशासकिय’ व्यवस्थेने घातलेल्या घोळात दुध संघ व स्थानीक नागरिक वेठीस!

Fursungi Devachi Uruli Garbage Depot | फुरसुंगी देवाची उरुळी कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शुटिंग; अक्षय कुमार, सारा अली खानच्या ‘स्कायफोर्स’च्या शूटिंगसाठी मागणी

दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे साडे तेरा लाख हडपले, हडपसर मधील प्रकार

वाईन शॉपमधून विदेशी दारूसह रोकड लंपास, दापोडी मधील घटना