Fursungi Devachi Uruli Garbage Depot | फुरसुंगी देवाची उरुळी कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शुटिंग; अक्षय कुमार, सारा अली खानच्या ‘स्कायफोर्स’च्या शूटिंगसाठी मागणी

पुणे : रस्त्यात कचरा दिसला तरी नाक मुरडायला होतं… विचार करा कचरा डेपोमध्येच गेलं तर अवस्था काय होईल. पण याला अपवाद ठरतोय तो महापालिकेचा कचरा डेपो… दुर्गंधी, आगीच्या घटना, जलस्रोतांचे प्रदूषण अशा आरोग्यावर परिणामांमुळे आरोपांच्या केंद्रस्थानी आलेल्या फुरसुंगी, देवाची उरुळी या कचरा डेपोचे (Fursungi Devachi Uruli Garbage Depot) महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) गेल्या काही वर्षात रुपडे पालटून तिथे वन उद्यान फुलवले. तिथे देश विदेशातून अभ्यासक तर येऊ लागले पण आतातर बॉलीवूड ला देखील त्याची भुरळ पडली आहे.

हो चक्क प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खानच्या आगामी ‘स्काय फोर्स’ चित्रपटाचे (Sky Force Movie) शूटिंग या कचरा डेपोच्या जागेवर होणार आहे. चित्रपटाचे छायाचित्रण व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने फुरसुंगी, देवाची उरुळी कचरा डेपोवर चित्रपटाचे शूटिंग करण्याची परवानगी मागितली आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पाच दिवस होणाऱ्या प्रत्यक्ष शूटिंगच्या तयारीसाठी 26 जानेवारी पासून कचरा डेपोच्या कॅपिंग केलेल्या आणि काँक्रेटिकरण केलेल्या जागेची मागणी करण्यात आली आहे. (Pune News)

न्यायालयाच्या आदेशनानुसार फुरसुंगी, देवाची उरुळी येथिल कचरा डेपोवरील ओपन डम्पिंग बंद करण्यात आले आहे. या ठिकाणच्या काही एकर वरील कचऱ्याचे लॅन्डफिलिंग करून त्यावर झाडे लावण्यात आली आहेत. तर दहा लाख टनाहून अधिक कचरा बायो मायनिंग प्रक्रियेद्वारे काढून जागा मोकळी करण्यात आली आहे. कॅपिंग केलेल्या कचऱ्याचे डोंगर वृक्षराजींनी नटल्यानंतर या डेपोचे रुपडे पालटले आहे. आगीच्या घटना बंद झाल्या असून कचऱ्याचा दर्प बऱ्याच अंशी नाहीसा झाला आहे. ज्या भागात अद्याप कचरा आहे तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे, त्याठिकाणी सातत्याने औषध फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे माशा व वास दोन्ही हद्दपार झाले आहेत.

पिसोळी हुन सासवड रोडच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कचरा डेपोतून निघणारे लिचेड ज्या खाणीत साठायचे ती बुजवून त्यावर सिमेंट काँक्रीट करण्यात आले आहे. आता तेथे छोटे क्रिकेट स्टेडियम झाले असून परिसरातील मुले तिथे क्रिकेट खेळतात. याचा वापर चित्रीकरणात हेलिपॅड म्हणून करण्यात येणार आहे. तर उर्वरित भागात लष्करी कॅम्प दाखविण्यात येणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना घनकचरा उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले की,
प्रशासनाने मागील काही वर्षात कचरा डेपोचा शास्त्रीय दृष्ट्या कायापालट केला आहे.
कचरा डेपोचे बदलललेले स्वरूप पाहण्यासाठी देश विदेशातील प्रशासनातील अधिकारी,
पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थी येतात, ही प्रशासनासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आता चित्रपटाच्या शूटिंगसाठी मागणी होत आहे, याचा आनंद आहे.
येथे चित्रपट शूटिंग मधून महापालिकेला आर्थिक उत्पन्न देखील मिळणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा जोरदार टोला, ६५ वर्षांचे अजितदादा सिनिअर सिटिझन,
कधी निवृत्ती घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय

Congress Leader Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांचे आमदार अपात्रतेवर मोठे भाष्य,
पहिला भूकंप नार्वेकरांच्या निर्णयानंतर, पण ते अंग काढून…

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला,
‘खोट्याच्या कपाळी गोटा’ हे येत्या निवडणुकीत कोकणी माणसं खरं करतील