Devendra Fadnavis | फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर ‘राम नाम जप’, ‘समृद्धी’वरील मृतांच्या कुटुंबियांचे २५ लाखांच्या मदतीसाठी आंदोलन

नागपूर : नागपुरातील संविधान चौकात शुक्रवारी दुपारी सुरू करण्यात आलेल्या राम नाम जप आंदोलनाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या आंदोलनात समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी ट्रॅव्हल्स अपघातात (Samruddhi Expressway Accident Victims) होरपळून मृत्युमुखी पडलेल्या २५ प्रवाशांचे कुटुंबिय सहभागी झाले आहेत. दरम्यान, फडणवीसांच्या कार्यालय परिसरात त्यांना राम नाम जप करण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने संविधान चौकात राम नाम जप सुरू करण्यात आला.

समृद्धीवरील या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पीडित कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखाची मदत जाहीर केली होती. या घोषणेला २०० दिवस होऊन गेले, परंतु अद्याप पीडित कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत मिळालेली नाही.

१ जुलै २०२३ रोजी नागपूरहून पुण्याला निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक मृत प्रवाशी होते.

अपघातानंतर उपमुख्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, दोनशे दिवस उलटले तरी ही पूर्ण रक्कम मिळालेली नाही. राज्य शासनाने अवघे ५ लाख व केंद्राने २ लाखांचीच मदत दिली आहे.

तसेच अद्याप दोषी ट्रॅव्हल्स कंपनीची मान्यता रद्द करणे, अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्याही मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने या कुटुंबियांनी अखेर हे आंदोलन सुरू केले.

आज राम नाम जपासाठी आंदोलक कुटुंबिय फडणवीस यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयापुढे आले असता शहर पोलिसांनी त्यांना दखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची नोटीस दिली. त्यामुळे तुर्तास हे आंदोलन संविधान चौकात केले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

HSC Exam Admit Card | १२ वीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून उपलब्ध होणार परीक्षेचे प्रवेशपत्र

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात १५ हजार, तर राज्यात ९० हजार घरांचे वाटप