Pune Pimpri Chinchwad Crime News | जेवणाचा टेबल लावण्यावरुन लग्नात राडा, नवरदेवासह नऊ जणांवर FIR; उरूळी कांचन येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्न सोहळ्यात स्टेज जवळ जेवणाचा टेबल टाकून लोकांना येण्या जाण्यास अडथळा निर्माण केला. याबाबत समजावून सांगण्यासाठी गेलेल्या मंगल कार्यालयाच्या मालकाला नऊ जणांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी नवरदेवासह नऊ जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.6) रात्री साडे आठच्या सुमारास उरुळी कांचन गावच्या हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात (Shri Krishna Mangal Karyalay) घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मंगल कार्यालयाचे मालक करण दिपक सणस (वय-27 रा. पुणे-सोलापूर रोडलगत, उरूळी कांचन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अभिजित राजु मिरगणे, राहूल रमेश रोदे, दत्ता (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह इतर पाच ते सहा अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 324, 143, 147, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित मिरगणे याचे फिर्यादी यांच्या मंगल कार्य़ालयात लग्न होते.
आरोपींनी लग्न समारंभाच्या स्टेज जवळ टेबल टाकून जेवण करत होते.
त्यामुळे त्याठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना त्रास होत असल्याने फिर्यादी हे आरोपींना समजावून सांगत होते.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना दमदाटी व शिवीगाळ केली.
तसेच हातातील कट्यारने फिर्यादी यांच्या हातावर मारुन जखमी केले.
तर पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवुन शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केल्याचे
फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | कात्रज डेअरीच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण!, ‘राजकिय व प्रशासकिय’ व्यवस्थेने घातलेल्या घोळात दुध संघ व स्थानीक नागरिक वेठीस!

Fursungi Devachi Uruli Garbage Depot | फुरसुंगी देवाची उरुळी कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शुटिंग; अक्षय कुमार, सारा अली खानच्या ‘स्कायफोर्स’च्या शूटिंगसाठी मागणी

दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे साडे तेरा लाख हडपले, हडपसर मधील प्रकार

वाईन शॉपमधून विदेशी दारूसह रोकड लंपास, दापोडी मधील घटना