Pune Pimpri Chinchwad Crime News | उघड्या दरवाजातून लॅपटॉप व मोबाईल चोरणाऱ्या तामिळनाडूतील टोळीला वाकड पोलिसांकडून अटक, 15 लॅपटॉप व 60 मोबाईल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड परिसरात सकाळच्या वेळी लोकांच्या घरांच्या उघड्या दरवाजातून घरात शिरुन घरातील लॅपटॉप व मोबाईल चोरणाऱ्या तामिळनाडूतील टोळीला वाकड पोलिसांनी (PCPC Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून 60 मोबाईल, 15 लॅपटॉप असा एकूण 14 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सौंदराजन गोविंदन (वय 21, रा.मादनुर ता. अंबुर, जि. वेल्लोर, तामिळनाडू), गुनासेकर संकर (वय 21), तामीलारसन मादेश (वय- 21 सध्या रा. आदिनाथ नगर, भोसरी मूळ रा. तामिळनाडू) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पिंपरी चिंचवड परिसरात सकाळच्या वेळी लोकांच्या उघड्या दरवाजातून लॅपटॉप व मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad Police Station) तपास पथकाने सीसीटीव्ही तपासले. यावेळी तीन वेगवेगळ्या वर्णनाचे आरोपी हे वाकड हद्दीत चोऱ्या करुन काळेवाडी फाटा येथून ते रिक्षाने पिंपरीकडे जात असल्याचे आढळून आले. आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली होती.

आरोपी चोरी केल्यानंतर एक दोन दिवस गॅप घेऊन पुन्हा गुन्हा करण्यासाठी येत असल्याचे निष्पन्न झाले. संशयित आरोपींचा शोध घेत असताना काळेवाडी फाटा येथे एक संशयित चालत जाताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता तीन मोबाईल व दोन लॅपटॉप मिळाले. तपासादरम्यान आरोपी तामिळनाडू राज्यातील असल्याचे समजले.

आरोपी ज्या ठिकाणी राहत होते तेथे आरोपी ठरलेल्या वेळेत परत आला नाही तर त्यांचे इतर साथीदार रुम सोडून मुद्देमालासह पळून जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे साथीदार भोसरी परिसरात राहत असल्याच निष्पन्न झाले. तपास पथकाने त्यांचा शोध घेतला मात्र ते पळून गेले. त्यांचा मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी ट्रॅव्हल्स बसने बेंगलोर येथे पळून जाणार असल्याचे समजले. तपास पथकाने ट्रॅव्हलचा पाठलाग करुन खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) बस थांबवून दोघांना ताब्यात घेतले.

तिन्ही आरोपींकडे चौकशी केली असता ते तामिळनाडूमधून चोरी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आले होते.
त्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात सकाळच्या वेळी फिरून उघड्या घरात प्रवेश करुन घरातील मोबाईल व लॅपटॉपची
चोरी करुन त्याची तामिळनाडू येथे विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी वाकड तसेच पिंपरी चिंचवड
शहरातील वेगवेगळ्या भागात चोरी केल्याचे कबुल केले. तसेच चोरलेले मोबाईल तामिळनाडु येथे पाठवल्याचे सांगितले.
त्यानुसार तपास पथकाने तामिळनाडू येथे जाऊन अनेक लॅपटॉप व मोबाईल जप्त केले.

आरोपींकडून 23 गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये वाकड पोलीस ठाण्यातील -11, निगडी -3, चाकण -2, चिंचवड 2,
चिखली- 3, भोसरी व एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त संजय शिंदे
(Joint CP Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole), सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग
विशाल हिरे (ACP Vishal Hire) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड
(Senior PI Ganesh Jawadwad), पोलीस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे (PI Vitthal Salunkhe),
सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील (API Santosh Patil), पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण (PSI Sachin Chavan),
सहायक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार संदीप गवारी, वंदु गिरे,
स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, अजय फल्ले,
भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खाराडे, रमेश खेडकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Intelligence Bureau Bharti | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आयबीमध्ये मोठी भरती, लवकर करा अर्ज, प्रक्रिया सुरू

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांनी पोलीस प्रशासनाची बाजू उचलून धरत पालकांना दिला दोष, ”१४ व्या वर्षी हातात मोबाईल…”

Post Viral On Social Media | लवकरच पुलवामा सारखा हल्ला होईल ! सोशल मीडियावर विद्यार्थ्याची पोस्ट; झारखंडमधील विद्यार्थी अटकेत, संरक्षण मंत्री काश्मीर दौर्‍यावर

NCP MP Amol Kolhe | अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू, राज्य सरकारवर ओढला आसूड, ”फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून…”

Solapur Karmala Accident News | शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या चार भाविकांचा कार अपघातात मृत्यू; आठ महिन्यांची मुलगी बचावली

Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कोंढवा, अलंकार पोलिस स्टेशन आणि वाहतूक शाखेत नियुक्त्या