Pune Pimpri Chinchwad Crime News | जीवे मारण्याची धमकी देऊन रोखली बंदूक, लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हुरडा खाण्यासाठी कुटुंबासमवेत गेलेल्या एका व्यक्तीला शिवीगाळ केली. तसेच बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याची घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीत घडली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील मौजे कोलवड येथील शेतात 1 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत चंद्रकांत महादेव कुंजीर (वय-51 रा. पारीजात सोसायटी, आकाशवानी, हडपसर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अविनाश बापुसाहेब सातव, तुषार राजाराम म्हस्के, योगेश अशोक शिंत्रे, नवनाथ तुकाराम घुले, एकनाथ पिराजी उंद्रे, आव्हाळे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 447, 141, 143, 147, 148, 149, 352, 504, 506 सह आर्म अॅक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुंजीर यांची कोलवडी येथे शेत जमीन आहे.
गुरुवारी फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासमवेत शेतात हुरडा खाण्यासाठी गेले होते.
रात्री आठच्या सुमारास आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी कुंजीर यांना अश्लील शिवीगाळ करुन तुम्ही या जागेतुन बाहेर
व्हा नाहितर या ठिकाणी रक्त सांडेल अशी धमकी दिली. आरोपी योगेश शिंत्रे याने त्याच्याजवळ असलेली बंदूक फिर्यादी यांच्यावर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. तर इतर आरोपींनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | प्राचीन भारताविषयी जागृती करण्यात हेरिटेज सेंटर मोलाची भूमिका बजावेल – नितीनभाई देसाई, ज्येष्ठ उद्योगपती

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ( PI, API) बदल्या व नेमणूका

Pune Congress News | पुणे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरुन काँग्रेस भवनमध्ये राडा