Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या 3 गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 1 काडतुस जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणारे व अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करुन विनापरवाना गावठी पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या तिघांना अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकाडून 1 लाख रुपये किमतीच्या 3 गावठी पिस्टल आणि 500 रुपयांचे एक जिवंत काडतुस (Cartridge) जप्त केले आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

प्रेम महेश जगताप (वय-19 रा. तुकाई नगर, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक), ऋषीकेश सुभाष ओझरकर (वय-25) रोशन दशरथ तेलंगे (वय-21 मुळ रा. यवतमाळ सध्या दोघे रा. ओझरकरवाडी, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.14) करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

हिंजवडी पोलीस ठाण्यातील (Hinjewadi Police Station) तपास पथकाचे पोलीस शिपाई बलसाने यांना माहिती मिळाली, की फेज दोन सर्कल येथे एकजण गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी आला आहे. पोलिसांनी इराणी कॅफेसमोर सापळा रचून आरोपी प्रेम जगताप याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 30 हजार रुपये किमंतीचे गावठी पिस्टल आणि 500 रुपयांचे एक जिवंत काडतुस मिळाले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता पिस्टल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

दरम्यान रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी अस्थापनांवर कारवाई करत असताना पोलीस नाईक नरळे यांना फेज तीन सर्कल जवळ दोनजण पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बस स्टॉपजवळ सापळा रचूला. पोलिसांची चाहुल लागताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ऋषीकेश आणि रोशन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 70 हजार रुपये किमतीच्या दोन गावठी पिस्टस सापडल्या. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांनी पिस्टल कोणाकडून व कशासाठी आणले याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), पोलीस सह आयुक्त संजय शिंदे
(Addl CP Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole), सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे
(ACP Vishal Hiray) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर
(Senior PI Vivek Muglikar), पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे (PI Sunil Dahiphale),
पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्याबापु देशमुख (PI Sonyabapu Deshmukh) तपास पथकाचे प्रमुख
सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे,
कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, कैलास केंगले, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे,
नरेश बलसाने, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सुभाष गुरव व सागर पंडीत यांच्या पथकाने केली.

Web Title :   Pune Pimpri Chinchwad Crime News | Hinjewadi police arrested 3 criminals carrying pistols without license, 3 pistols and 1 cartridge seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raosaheb Danve | रावसाहेब दानवेंचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘आम्ही त्यांना पैसे दिले हे…’

Pune Police News | पुणे : बांधकाम ठेकेदारास वेठीस धरणारे 2 पोलिस तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या प्रकरण

Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

Pune Crime News | पोलिसाच्या थोबाडीत मारल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी अटकेत; 3 दिवसांची पोलीस कोठडी