Raosaheb Danve | रावसाहेब दानवेंचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘आम्ही त्यांना पैसे दिले हे…’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे (Controversial Statements) चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आले आहेत. यांना आपण पैसे दिले हे आपल्यालाच मतदान करणार आहेत, असं वक्तव्य रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील रस्त्याचं उद्घाटन दावने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche) यांनी मला सांगितलं यांना आपण पैसे दिले हे आपल्याला मतदान करणार आहेत. त्यामुळे गावातल्या लोकांनी एकच शिक्का चालवा असं दानवे म्हणाले. दानवे यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दानवेंच्या वक्तव्यावर विरोधक कसे प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल.

यावेळी बोलताना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
काँग्रेसवाले निवडणुकीच्या वेळी मुस्लिम बांधवांना बैहकवातात, आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात.
शरद पवारही (NCP Chief Sharad Pawar) भाजपला जातीयवादी म्हणतात, असं दानवे म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी विरोधकांची बैठक बोलावली.
यावरुन दानवे यांनी नितीश कुमार यांना जोरदार टोला लगावला. नितीश कुमार यांना पंतप्रधान व्हायचं आहे, म्हणून त्यांनी विरोधकांची बैठक बोलवली असल्याचे दावने यांनी सांगितले.

Web Title : Raosaheb Danve | once again controversial statement by union minister raosaheb danve

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actor Tamanna Bhatia | तमन्नाच्या ‘या’ नव्या वेबसिरीजमधील अभिनयावर प्रेक्षक फिदा

Pune Crime News | कात्रज-आंबेगाव बु. परिसरात दशहत निर्माण करणार्‍या प्रेम शिंदे टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई

Jayant Patil | ‘या’ घटनांचा उल्लेख करत जयंत पाटलांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र