Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तु माझ्या पुढे गेलासच कसा’ ट्रकचालकाची कार चालकाला दमदाटी करुन मारहाण; लोहगाव-वाघोली रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तु माझ्या पुढे गेलासच कसा’ असे म्हणत ट्रक चालकाने चारचाकी चालकाला दमदाटी करुन मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.3) मध्यरात्री साडेबारा ते पाऊणच्या दरम्यान लोहगाव-वाघोली रोडवर (Lohegaon-Wagholi Road) घडली आहे. याप्रकरणी ट्रक चालकावर विमानतळ पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी कॅजिटन माईकल डिसोझा Cajiton Michael D’Souza (वय 20 रा. सुप्रिम आंगण सोसायटी, वाघोली) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एमएच 12 एम व्ही 4172 या क्रमांकाच्या ट्रक चालकावर आयपीसी 326 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅजिटन यांचे वडील माईकल डिसोझा हे त्यांची स्वीफ्ट कार घेऊन लोहगाव वाघोली
रोडने जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या एका ट्रक चालकाने त्यांच्या गाडीसमोर ट्रक थांबवला.
त्यानंतर ट्रक चालकाने खाली उतरत माईकल डिसोझा यांच्याजवळ हातात लोखंडी रॉड घेऊन येत ‘तु माझ्या पुढे
गेलासच कसा काय’ असे म्हणत त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत माईकल डिसोझा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन (API Vijay Chandan) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दुचाकीच्या चाकावरुन आरोपीला अटक, महाळुंगे पोलिसांकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील 29 लाखांचा ऐवज जप्त

पोलिसांना पैसे देण्याच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक, कोंढवा परिसरातील प्रकार

Nashik Crime News | खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तलवारीसह नाशिक पोलिसांकडून अटक, 8 महिन्यांपासून होता फरार