Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हातवारे, आरोपीला अटक; धनकवडी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेसोबत लिफ्ट मेंटेनन्स वरुन वाद झाल्याने आरोपीने महिलेच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीकडे (Minor Girl) पाहून अश्लील हातवारे (Obscene Gestures) केले. तसेच जिन्यातून येता-जाता मुलीचा हात पकडून गैरवर्तन केल्याप्रकरणी 44 वर्षीय व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत पीडित मुलगी राहत असलेल्या बिल्डिंग मध्ये आणि घराच्या परिसरात घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत धनकवडी परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.2) सहकारनगर पोलीस ठाण्यात
(Sahakar Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सचिन शंकर बोराडे Sachin Shankar Borate (वय-44 रा. धनकवडी) याच्यावर आयपीसी 354, 354(अ) सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आईचे व आरोपीचे लिफ्टच्या मेंटेनन्स वरुन जानेवारी 2023 मध्ये वाद
झाला होता. तेव्हा पासून आरोपी सचिन बोराडे याने पीडित मुलीकडे पाहून हातवारे करत होता.
तसेच मुलीला तिचा फोन नंबर मागून डोळा मारला. जिन्यातुन जाताना तिचा हात पकडला असता मुलीने हिसका
मारून पळून गेली. आरोपीच्या भीतीने मुलीने कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन देखील घेतले नाही, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 37 वर्षीय आईने राष्ट्रीय महिला आयोगाकडे (National Commission for Women) तक्रार
अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करुन सहकारनगर पोलिसांनी (Pune Police) मंगळवारी आरोपी
सचिन बोराडे याच्यावर विनयभंग (Molestation Case) व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठारे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जाहिरातींच्या हक्कांच्या बदल्यात शौचालयांची देखभाल दुरूस्ती; प्रशासनाने घनकचरा विभागाचा प्रस्ताव रद्द केला

बेकायदा बांधकामे आढळल्यास तातडीने कारवाईचे आदेश

Pune PMC News | पुणे महापालिकेचा कारभार होतोय ‘डिजिटल’ ! 60 पैकी 16 विभागात ई ऑफिस प्रणाली कार्यन्वीत – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियाचे आरक्षण टाकणार

‘मतांचे’ राजकारण आणि अर्थकारणामुळे पुणे शहर होतेय वेगाने बकाल