Pune Pimpri Chinchwad Crime News | आय टी इंजिनिअरला सायबर चोरट्यांकडून गंडा, एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव वापरत २६ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | इडी (ED), सीबीआय (CBI) यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) झाल्याचे सांगून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांवर सध्या कारवाई करीत आहे. त्याचा गैरफायदा आता सायबर चोरटे (Cyber Thieves) घेताना दिसत आहेत. एका आयटी इंजिनिअरला (IT Engineer) तुमच्या आधार कार्डचा वापर करुन तुमच्या खात्यातून मनी लॉन्ड्रिंग होत असल्याची भिती दाखवून २६ लाख रुपयांना गंडा घातला. इतकेच नाही तर त्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याचे (Police Officer Pradeep Sawant) नाव वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एका ३१ वर्षाच्या आय टी इंजिनिअरने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद हे मुळचे लखनौ येथील राहणारे असून हिंजवडीतील एका कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना २३ डिसेबर रोजी राहुल देव नाव सांगणार्‍याने फेडेक्स कुरिअर मधून (FedEx Courier) बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने मुंबई ते तैवान असे एक कुरीअर जात असून त्यात १० एक्सपायर पासपोर्ट, ५ किलो कपडा, ६ आय सीआय सीआय क्रेडिट कार्ड, ९५० ग्रॉम एम डी असे सामान असल्याचे सांगून हे पार्सल तुम्ही पाठविले आहे का, अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादी यांनी ते पार्सल आपण पाठविले नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने तुम्हाला मुंबई सायबर सेलमध्ये (Mumbai Cyber Cell) एक कंम्प्लेट करावी लागेल, असे सांगून फोन जोडून दिला. परंतु तो फोन डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर त्यांना एक कॉल आला. समोरच्या व्यक्तीने मुंबई सायबर सेलमधून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तुमची ऑनलाईन तक्रार स्काईप कॉलवरुन घेतली जाईल, असे सांगितले.

त्यानंतर त्याने तुमचा आधार (Aadhaar Card) नंबर इनलिगल अ‍ॅक्टीव्हीटीज साठी वापरला जात आहे.
त्यावरुन मनी लॉन्ड्रिंग होत आहे. तुमच्या आधार नंबरवर विविध बँकाचे ३६ अकाऊंटस आहेत, स्काईप आयडीवर ईस्माईल नावाच्या व्यक्तीचा फोटो पाठवून हा मनी लॉड्रिंगमध्ये पकडला असून त्याने तुमच्या ३६ बँक अकाऊंडस मनी लॉन्ड्रिंगमध्ये वापरले जात असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी आपली केवळ दोनच अकाऊंटस असल्याचे सांगितले.

त्यावर फोन करणाऱ्या व्यक्तीने ७ वर्षाची नॉनबेलेबल जेल होईल, तुमचे संपूर्ण करिअर खराब होईल, असे सांगितले.
त्या दोन बँकांचे अकाऊंट व्हेरीफाय करावे लागतील, त्यासाठी मला काही रक्कम पाठवावी लागेल, असे सांगून त्यांना
९८ हजार ८८७ रुपये पाठविण्यास सांगितले. या सर्व प्रकाराने घाबरून फिर्यादी यांनी तो सांगेल, त्याप्रमाणे पैसे पाठविले.
तो वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे मागवत गेला. सुरुवातीला त्यांनी ५ लाख १३ हजार रुपये पाठविले.
त्यानंतर त्याने फिर्यादी यांना सिबील चेक करायचे असल्याचे सांगून इंन्स्टंट लोन जेवढे दिसेल, तेवढे घ्या असे सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांनी २० लाख रुपये घेतले.

त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने तुमचे सर्व ट्रान्जेकशन चेक करुन तुमचे सर्व पैसे एक तासात परत तुमच्या
अकाऊंटवर पाठविले जातील असे सांगून कर्ज घेतलेली रक्कम पाठविण्यास सांगितली.
त्यानुसार त्यांनी १३ लाख रुपये पाठविले. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांनी स्काईप कॉल केला.
परंतु, कॉल कनेक्ट झाला नाही. तसेच फोनवर बोलणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याशी यांच्याशी संपर्क झाला नाही.
तेव्हा आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी वाकड पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली.

तुम्ही पार्सल पाठविले नसतानाही तुमच्या नावाने कोणी पार्सल पाठविले असल्याचे कॉल आला तर त्यावर विश्वास ठेवू नका,
अशा कॉलने घाबरुन न जाता त्यांना प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedies For Swollen Feet | पायांची सूज होईल दूर, फक्त करा ‘हे’ 5 घरगुती उपाय…

Anti Aging Tips | ‘या’ 5 गोष्टी हिरावून घेतात तुमचे सौंदर्य, वयाच्या 24 व्या वर्षी तुम्ही दिसता 34 सारखे.. त्यामुळे आजच करा हे उपाय…!

How To Get Rid Of Belly Fat | हिवाळ्यात ‘या’ 6 गोष्टींचा करा आहारात समावेश, चरबी वितळेल अगदी लोण्यासारखी…