Pune Pimpri Chinchwad Crime News | अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, पुण्यातील धक्कादायक प्रकार

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीत घडली आहे. हा घृणास्पद प्रकार शनिवारी (दि.23) रात्री अकराच्या सुमारास खंदवेनगर येथील एका सोसायटीच्या बाल्कनीत घडला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत खराडी येथे राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेने रविवारी (दि.24) विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन श्रीधर गणपत उकीर्डे Shridhar Ganpat Ukeerde (रा. 35 रा. मु.पो. कान्हुर मेसाई, उकीर्डे वस्ती, ता. शिरुर) याच्यावर आयपीसी 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला सीआरपीसी कलम 41(अ)(1) नुसार नोटीस बजावली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरातील खंदवेनगर येथे पीडित फिर्यादी महिलेच्या घराचे बांधकाम
सुरु आहे. महिला घराच्या बांधकामास पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांच्या घरासमोर राहणारा
आरोपी श्रीधर हा त्याच्या घराच्या बालक्नीत आला. त्याने अंगावरील सर्व कपडे काढून फिर्यादी यांच्याकडे पाहून
अश्लील हावभाव करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला सीआरपीसी नुसार नोटीस बजावली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग