Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : रागाने पाहिल्याच्या कारणावरुन ज्येष्ठ नागरिकाला मारहाण, तरुणाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | एकमेकांकडे पाहिल्याच्या कारणावरुन एका तरुणाने ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केल्याची घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.9) रात्री आठच्या सुमारास पीसीएनटीडीए येथे घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत गणपत किसन इघे (वय-59 रा. श्रीराम कॉलनी, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहन अनिल विश्वकर्मा (वय-20 रा. खंडेवस्ती, झोपडपट्टी, भोसरी) याच्यावर आयपीसी 326, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणपत इघे हे त्यांच्या घरासमोरील रोडवर वॉकींग करत होते. त्यावेळी आरोपी याने फिर्यादी यांना ‘तू माझ्याकडे रागाने का बघतोस’ अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी यांनी ‘मी कुठे तुझ्याकडे रागाने बघतोय’ असे म्हणाले. याचा राग आल्याने आरोपी रोहन याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने कानशिलात लगावली. त्यामुळे फिर्यादी हे रोडवर खाली पडल्याने त्यांच्या डाव्या बाजूचे हाड फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाले आहेत. गणपत इघे यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी रोहन याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना महाळुंगे पोलिसांकडून अटक, एक किलो सोने जप्त

Sharad Mohol Murder Case | …तर शरद मोहोळचा ‘गेम’ झाला नसता, कटात सामील न झाल्याने पोळेकरकडून भूगावमध्ये एकावर गोळीबार

Dr Sanjeev Thakur | ललित पाटील प्रकरण : ससून रूग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसांना पुरावे मिळाले, अटक होणार?

Eknath Shinde Group | शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य, ”ठाकरे गट पुन्हा फुटणार, १४ तारखेला काय होतंय पहा…”

Uddhav Thackeray | घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान, पंतप्रधानांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ”गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय…”

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळच्या खूनासाठी मदत करणाऱ्या आणखी तिघांना अटक

Pune: Constructor Ended His Life Following Moneylender’s Constant Harassment; Complaint Against Accused for Instigating Suicide