Pune Pimpri Chinchwad Crime News | आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणार्‍या 5 बुकींना अटक, 14 मोबाईल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा (Online Bet On IPL Cricket Matches) घेणार्‍या 5 बुकींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने (Pimpri Chinchwad Police Crime Branch) छापा टाकून अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 वायफाय, जुगाराची साधने आणि रोख रक्कम असा सुमारे एक लाख रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चिंचवडगांव (Chinchwadgaon) येथील मेट्रोपॉलिटन सोसायटीच्या (Metropolitan Society) 6 व्या मजल्यावरील फ्लॅट नं. 602 येथे करण्यात आली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

गोविंद प्रभुदास लालवानी Govind Prabhudas Lalwani (45), कन्हैयालाल सुगुणुमल हरजानी Kanhaiyalal Sugunumal Harjani (61), देवानंद प्रतापराव दरयानी Devanand Prataprao Daryani (51), रमेश दयाराम मिरानी Ramesh Dayaram Mirani (63) आणि हरेश हनुमंत थटाई Haresh Hanumant Thattai (58, सर्व रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दि. 11 एप्रिल रोजी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम (PI Jitendra Kadam) यांना मुंबई इंडियन्स विरूध्द दिल्ली कॅपिटल या संघामध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर काही जण चिंचवड येथील उच्चभ्रु सोसायटीमध्ये सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिस पथकाने चिंचवडगांव येथील मेट्रोपॉलिटन सोसायटीच्या 6 व्या मजल्यावरील फ्लॅट नं. 602 येथे छापा टाकला.
त्यावेळी तेथे 5 जण हे आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑलनाइन सट्टा घेत असल्याचे आढळून आले.
ते त्यांच्या मोबाईलमध्ये ताज 777 नावाच्या अ‍ॅपवर (Taj 777 App) टिव्हीवरील प्रेक्षपणापुर्वी एक बॉल अगोदर
मॅच पाहत होते आणि त्याचा फायदा घेवून लोकांकडून ऑनलाइन सट्टा घेत होते. त्यांच्याकडून 14 मोबाईल,
जुगाराचे साहित्य असा एकुण सुमारे एक लाख रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदरील गुन्हयाची व्याप्ती मोठी असुन महाराष्ट्र राज्यातील व राज्याच्या बाहेरील बुकींची साखळी असण्याची
शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश माने (PSI Ganesh Mane) अधिक तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त वियकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey), पोलिस सह आयुक्त मनोज लोहिया
(IPS Manoj Lohiya), अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे (IPS Dr. Sanjay Shinde),
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore), सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर
(ACP Dr. Prashant Amrutkar ) यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-2 चे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम,
पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, पोलिस अंमलदार जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, देवा राऊत आणि सागर अवसरे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Pimpri-Chinchwad police Crime Branch arrest five bookies for betting on IPL cricket matches, seize 14 mobile phones

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Devendra Fadnavis | डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस