Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड परिसरात गांजा (Marijuana) विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील (PCPC Police) तपास पथकाने अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून तीन लाखांचा 5 किलो 990 ग्रॅम वजनाचा गांजा आणि दुचाकी असा एकूण 4 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मलीकजान शब्बीर बलगानूर (वय-24 रा. सेक्टर नं. 22, निगडी), गुनानिधी रतन साह (वय-29 रा. काळभोर नगर चिंचवड, मुळ रा. पटुका साईपल्ली, ओडीसा) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील (MIDC Bhosari Police Station) तपास पथकाचे पोलीस अंमलदार प्रविण मुळुक व भागवत शेप यांना माहिती मिळाली की, बोऱ्हाडे वाडी मोशी येथे एकजण गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे.
यानुसार तपास पथकाने बोऱ्हाडे वाडी येथे सापळा रचून केटीएम (KTM) दुचाकीवरुन आलेला आरोपी मलीकजान
याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगची तापासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. आरोपीची पोलीस कोठडी घेऊन त्याचा साथीदार गुनानिधी साह याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 99 हजार 500 रुपयांचा गांजा आणि 1 लाख 20 हजार रुपयांची केटीएम दुचाकी असा एकूण 4 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त संजय शिंदे
(Joint CP Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-03 संदीप डोईफोडे (DCP Sandeep Doifode), सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर
(ACP Dr. Vivek Muglikar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे
(Sr PI Rajendra Nikalje), सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. पांचाळ (API S.S. Panchal),
पोलीस उपनिरीक्षक आर.बी. पानसरे (PSI RB Pansare), पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, संजय जरे,
गणेश बोऱ्हाडे, राहुल लोखंडे, प्रविण मुळुक, भागवत शेप, अनिल जोशी, नितीन खेसे, विशाल काळे, अक्षय क्षिरसागर
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | थर्टी फर्स्टच्या रात्री टोळक्याचा कर्वेनगर भागात राडा, दोन जणांना बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (Video)

आंबेगाव येथील अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेची कारवाई

अडीच वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाचा खून, खडकी परिसरातील घटना; दोन अल्पवयीन मुले ताब्यात

Nashik Crime News | एक वर्षापूर्वी सिमेन्स कंपनीत झालेल्या चोरीचा नाशिक पोलिसांकडून छडा, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त