Pune Pimpri Chinchwad Crime News | थर्टी फर्स्टच्या रात्री टोळक्याचा कर्वेनगर भागात राडा, दोन जणांना बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रविवारी (दि.31 डिसेंबर) थर्टी फर्स्ट (Thirty First) असल्याने पुणेकरांनी सरत्या 2023 वर्षाला निरोप देऊन नवीन 2024 वर्षाचे उत्साहात स्वागत केले. मात्र, पुण्यातील कर्वेनगर (Karvenagar) परिसरात एका टोळक्याने धुडगूस घालून दोघांना बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार 31 डिसेंबरला रात्री घडला असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीत (Hingane Home Colony) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनी मध्ये टोळक्यांनी दोन जणांना बेदम मारहाण केली. राहुल कावळे आणि निखिल पाबळे असे मारहाण झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. थर्टी फर्स्टच्या दिवशी भररस्त्यात टोळक्याकडून दोघांना मारहाण केल्याने परिसरात दहशत पसरली. ही घटना वारजे पोलीस ठाण्याच्या (Warje Police Station) हद्दीत घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

निखिल पाबळे हा रस्त्यावरुन पायी जात होता. त्यावेळी टोळक्यामधील एकाने त्याच्या कानाखाली मारली. याचा जाब विचरण्यासाठी राहुल कावळे आणि निखिल पाबळे हे गेले होते. त्यावेळी टोळक्याने दोघांना दमदाटी करुन बेदम मारहाण केली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तरुणाला मारहाण करुन गाडी घेण्यासाठी साठवलेले पैसे आणि आयफोन हिसकावला, चिखली येथील प्रकार

Hit and Run Law | हीट अँड रन : वडेट्टीवार यांचा आरोप, अधिकाऱ्यांना पुढे करून जनतेच्या रोषापासून वाचण्याचा सरकारचा प्रयत्न

Raju Shetty | मोतोश्रीवरील भेटीनंतर राजू शेट्टी म्हणाले, ”जागावाटपाची चर्चा नाही, आम्हाला अदानींचा त्रास म्हणून…”

दाम्पत्याला शिवीगाळ करुन घरावर दगडफेक, कोंढवा परिसरातील घटना